शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला शह

By admin | Updated: January 14, 2016 03:55 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या उमेदवारीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळविलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर भाजपाने शहराध्यक्षपदाची

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या उमेदवारीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळविलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर भाजपाने शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. भाजपाचे आमदार म्हणून सव्वा वर्षापासून काम करणाऱ्या जगताप यांचा अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवकांवर प्रभाव आहे. हेच लक्षात घेऊन जगताप यांची निवड करून भाजपाने राष्ट्रवादीला शह दिला आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेळोवेळी त्यांच्या पक्षातील नगरसेवक, कार्यकर्त्यांना तंबी दिली. त्यास न जुमानता त्यांचे डझनभर नगरसेवक हे आमदार जगतापसमर्थक म्हणून वावरत आहेत. आगामी काळात भाजपाची ताकत वाढवून राष्ट्रवादीला शह देण्याच्या इराद्याने भाजपाने जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीने आगामी काळात ‘राष्ट्रवादी’ला खिंडार पडण्याची चर्चा आहे.गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारून लक्ष्मण जगताप यांनी शेकापच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी जगताप यांचे उघडपणे काम केले होते. त्या निवडणुकीतील पराभव पचवून जगताप यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली. भाजपाच्या उमेदवारीवर त्यांनी चिंचवड मतदारसंघातून यश मिळविले. जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) माध्यमातून निवडणूक लढवली. त्यानंतर भाजपाच्या माध्यमातून निवडणूक लढवली. थोड्या अवधीत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तरी त्यांना मानणारा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवक, कार्यकर्त्यांचा गट कायम त्यांच्या पाठीशी राहिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा आणि कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या कारवाईच्या धमक्यांना कोणी भीक घातली नाही. भाजपात गेल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच महापालिकेत आपला प्रभाव टिकवून ठेवण्याची जगताप यांची बलशाली बाजू लक्षात घेऊन भाजपाच्या धुरंधर नेतृत्वाने त्यांची शहराध्यक्षपदावर निवड करण्याची खेळी खेळली आहे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आमदार जगताप यांच्या ताकतीचा उपयोग करून घेण्याची हीच वेळ आहे, हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस खिळखिळी करून भाजपाची ताकत वाढवता येईल, अशी रणनीती भाजपाने यामागे अवलंबली आहे. गतवर्षी झालेल्या शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत आपल्या मर्जीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्यांनी महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. स्वीकृत सदस्य पदावर कार्यकर्त्यांची वर्णी लावली. भाजपात असूनही राष्ट्रवादीच्या गोटातील सूत्रे हलविण्याची किमया त्यांनी घडवून आणली. यावरून त्यांची पालिकेच्या राजकारणावरील पकड टिकून असल्याचा प्रत्यय आला. त्यांचे या शहरातील नातेगोते, तसेच जोडलेला अन्य गोतावळा यामुळे भाजपाची ताकत वाढविण्यास मदत होणार आहे. भाजपाची ताकत वाढविण्याबरोबर त्यांना नेतृत्वाचे कसब दाखवावे लागणार आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाच्या वाटेवरमहापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपाच्या वाटेवर आहेत. भाजपाचे आमदार जगताप यांचे समर्थक असलेला महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट जगताप यांच्या भाजपा शहराध्यक्ष पदाच्या निवडीने सुखावला आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योग्य वेळी संधी साधून भाजपामध्ये प्रवेश करण्याची त्यांची तयारी आहे. आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल, अशी त्यांना आशा आहे. भाजपाच्या शहराध्यक्षपदाची धूरा आमदार जगताप यांनी खांद्यावर घेतली आहे. राष्ट्रवादीत ज्याप्रमाणे स्थानिक नेत्यांच्या मर्जीने कारभार चालत होता. त्याप्रमाणे भाजपात कारभार करता येणार नाही. एखाद्याला पदावर संधी द्यायची अथवा निवडणुकीत उमेदवारी द्यायची याचा निर्णय घेताना भाजपात वेगळी प्रक्रिया आहे. भाजपाच्या प्रचलित कार्यपद्धतीत काम करणे तसेच निर्णय प्रक्रिया राबविणे आमदार जगताप यांच्यासाठी कसरतीचे ठरणार आहे.