शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड हादरले! मानलेल्या बहिणीच्या मांडीला हात लावल्याने तरुणाचा नदीत बुडवून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:05 IST

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबरला गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन जणांना अटक केली...

पिंपरी : मानलेल्या बहिणीच्या मांडीला हात लावल्याने तरुणाला पवना नदीत बुडवून खून केला. पिंपळे सौदागर येथे मे २०२१ मध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबरला गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन जणांना अटक केली. राहुल नंदू भालेराव (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुलच्या आईने फिर्याद दिली. ओंकार मिलिंद गायकवाड (वय १९), केदार घनश्याम सूर्यवंशी (वय २२, दोघेही रा. पिंपळे गुरव) यांना अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार, केदार, मयत राहुल आणि एक मुलगी हे मित्र होते. ओंकार आणि केदार यांनी संबंधित तरुणीला बहीण मानले होते. राहुलने त्या तरुणीच्या मांडीला हात लावला. याचा राग आल्याने ओंकार आणि केदारने राहुलला पिंपळे सौदागर येथे पवना नदीत नेले. लोखंडी हातोडी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून नदीच्या पाण्यात बुडवले. यात राहुलचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद होऊन चौकशी झाली. त्यानुसार सात महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला.   

पावणेपाच लाख रुपये उकळलेगुन्हा दाखल होण्याची भीती घालून एका मध्यस्थीने आरोपींकडून चार लाख ७० हजार रुपये उकळले. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. संतोष शंकर सरोदे (रा. प्रभातनगर, पिंपळे गुरव), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समीर सतीश रोकडे (वय २६, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी रोकडे, खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी, मयत राहुल आणि संबंधित तरुणी हे पाचजण मित्र होते. फिर्यादी समीरचा मित्र राहुलचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या चौकशीतून सुखरूप बाहेर काढतो. अन्यथा तुमच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती घालून आरोपीने फिर्यादीकडून चार लाख ७० हजार रुपये जबरदस्तीने खंडणी पोटी उकळले.

टॅग्स :Puneपुणेpimpale guravपिंपळेगुरवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी