शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून खून; एकाला अटक, खुनाचे कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:31 IST

खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट...

पिंपरी : चिखली येथे आठ वर्षांच्या मुलाचा खून झाल्याची घटना रविवारी घडली होती. लक्ष्मण बाबूलाल देवाशी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गुंडाविरोधी पथक आणि चिखली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. यातील एकाने चौकशीदरम्यान खुनाची कबूली दिल्याची माहिती आहे. त्यामुळे एका आरोपीला अटक केली आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काही दिवसांपूर्वीच हा परिसर सोडून गेला होता. तो पुन्हा परिसरात कशासाठी आला, असा संशय पोलिसांना आल्याने गुंडाविरोधी पथकाने त्याची माहिती घेतली. सीसीटीव्हीची पोलिसांनी मदत घेतली. चिखली पोलीस दुपारी बारा वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. मात्र आरोपीने साडेअकरा वाजण्यापूर्वीच लक्ष्मणचा खून केला होता. त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने खुनाची कबुली दिल्याची माहिती आहे. सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून खून केल्याचे येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आले होते. मुलाचा मृतदेह एका पडक्या पत्राशेडमध्ये आढळून आला होता.

नातेवाइकांचा संताप-जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलाच्या नातेवाइकांनी सोमवारी घेतली होती. हीच भूमिका मंगळवारीदेखील नातेवाइकांनी घेतली होती. यात मागणीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनसमोर नातेवाईक आणि या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. चिखली पोलीस स्टेशनवर मोर्चादेखील काढण्यात आला होता.

उलटसुलट चर्चा-

मृत्यू झालेल्या मुलाचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे कारण अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असून लवकरच याबाबत माहिती दिली जाईल. मात्र ज्या कारणामुळे खून झाला अशी चर्चा सुरू आहे, त्या कारणामुळे खून झालेला नाही हे आतापर्यंतच्या तपासावरून दिसून येते.- आनंद भोईटे, पोलीस उपआयुक्त

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस