Pimpri Chinchwad | नवीन बॉयफ्रेंड बनवल्याचा राग, मुलीचा कोयत्याने वार करुन खून
By रोशन मोरे | Updated: April 5, 2023 16:58 IST2023-04-05T16:58:44+5:302023-04-05T16:58:59+5:30
मुलीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून आरोपींनी मुलीचा खून केल्याचे उघड झाले आहे...

Pimpri Chinchwad | नवीन बॉयफ्रेंड बनवल्याचा राग, मुलीचा कोयत्याने वार करुन खून
पिंपरी : बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.४) उघडकीस आली होती. मुलीच्या मृतदेहावर वार केल्याच्या खूना होत्या. पोलिसांनी मृतदेह मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. मुलीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून आरोपींनी मुलीचा खून केल्याचे उघड झाले आहे.
ही घटना शनिवारी (दि.१) चिखली, घरकलू परिसरातील सांस्कृतिक भवनच्या चालू बांधकाम साईटवर घडली. या प्रकरणी महिलेने रविवारी (दि.२) मुलगी हरवल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्ष पाच महिन्याची मुलगी बाहेर जाते असे सांगून घरातून गेली होती. ती परत न आल्याने ती हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. मुलीवर धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचे दिसून येते होते. पोलिसांनी मुलीच्या मोबाईलच्या सीडीआरवरुन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता त्यातील एका आरोपीने मुलीने नवीन बॉयफ्रेंड बनवला असल्याचा राग मनात धरून तिला भेटण्यासाठी बोलवले. ती भेटायला आली असता तिच्यावर कोयत्याने वार करून तिचा खून केला.