गळा आवळून व्यापाऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 06:22 IST2018-05-03T06:22:35+5:302018-05-03T06:22:35+5:30

येथील एका व्यापाºयाचा गळा आवळून खून करण्यात आला़ ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली़ प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय ५१) असे मृत झालेल्या व्यापा-याचे नाव आहे.

The murder of businessman by the throat | गळा आवळून व्यापाऱ्याचा खून

गळा आवळून व्यापाऱ्याचा खून

पिंपरी : येथील एका व्यापाºयाचा गळा आवळून खून करण्यात आला़ ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली़ प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय ५१) असे मृत झालेल्या व्यापा-याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप विरुमल हिंगोरानी (वय ५१, रा. पिंपरी बाजारपेठ) हे बुधवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आले.
रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सकाळी नऊच्या सुमारास मोलकरीण त्यांच्या घरी आली. त्या वेळी प्रदीप मृतावस्थेत पडल्याचे तिला निदर्शनास आले.
सुरुवातीला आत्महत्या की खून झाला असावा, याबाबत तर्क विर्तक लावले जात होते. मात्र प्रदीप यांच्या गळ्यावर ओरखडे असल्याचे दिसून आले. संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालातही गळ्याला ओरखडे असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये खूनाच्या घटनामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याने परिसरातील नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.

Web Title: The murder of businessman by the throat