शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी महापालिकेला पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:03 IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना वापरता येईल,अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

ठळक मुद्देदिव्यांग व्यक्तिंना हाताळण्याच्या दृष्टीने परिपूर्ण करण्साठी मार्गदर्शक सुचनांचा अभ्यास

पिंपरी : दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाची बेस्ट अ‍ॅक्सेसेबल वेबसाईट अवॉर्डसाठी निवड झाली असून उपपंतप्रधापन व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या डिसअँबेलिटीसाठीच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली संकेतस्थळे (वेबसाईट) दिव्यांग व्यक्तींना वापरण्याच्या दृष्टीने परिपुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत कळविले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तिंना हाताळण्याच्या दृष्टीने परिपूर्ण करण्साठी मार्गदर्शक सुचनांचा महापालिका स्तरावर अभ्यास करण्यात आला. महापालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तिंना वापरण्यासाठी परिपूर्ण केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना वापरता येईल, अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग,सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना हाताळण्यास उत्कृष्ट संकेतस्थळ अशी राष्ट्रीय स्तरावर माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेतर्फे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग यांनी दिनांक ६ नोव्हेंबरला महानगरपालिकेचे संकेतस्थळाची निवड झाल्याचे कळविले होते. जागतिक अपंगदिनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाला. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री  थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय आणिसक्षमीकरण राज्यमंत्री विजय सांपला, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपपस्थित होते. पारितोषिक मिळविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे महापालिकेने कळविले आहे. हा पुरस्कार महापालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव व मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी स्विकारला. महापौर राल जाधव म्हणाले, महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक आॅनलाईन सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेचे संकेतस्तळावर विविध सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळेच दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी महापालिकेचा गौरव झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडिया