शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोजर; मुलांच्या शैक्षणिक वर्षाबाबत पालक आक्रमक

By प्रकाश गायकर | Updated: February 16, 2024 18:08 IST

शाळेच्या संचालकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम केल्याचीही माहिती समोर आली

पिंपरी : शहरातील रावेत कॉर्नर येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद शेख यांने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या महिला साथीदाराला पोलिसांनी अटक केली. यानंतर या शाळेला मान्यता नाही, तसेच निवासी शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम केल्याचीही माहिती समोर आली. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या बांधकामावर बुलडोजर फिरवत कारवाई केली आहे. त्यामुळे आता शाळा बंद झाली असून पालक त्यांच्या मुलांना घरी घेऊन गेले आहेत.

निवासी शाळेतील विद्यार्थिनीवर दुष्कृत्य करणारा नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली रावेत येथे निवासी शाळा चालवतो. त्याच शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३० जानेवारी रोजी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलींचे समुपदेशन करत गैरप्रकार झाला असेल तर पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर नौशाद शेख याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास करत असताना या निवासी शाळेबाबत अनेक धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या.

निवासी शाळेच्या वसतिगृहासाठी समाजकल्याण विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, ही परवानगी नसल्याची बाब समोर आली. तसेच निवासी शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम करत अतिक्रमण केले असल्याचेही महापालिकेने केलेल्या तपासात समोर आले. त्यामुळे या वाढीव बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार, शुक्रवारी (दि. १६) महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकाने या निवासी शाळेवर कारवाई केली. यामध्ये मेस, कार्यालय, वर्गखोल्या तसेच वेटिंग रुमसाठी केलेले वाढीव बांधकाम पाडण्यात आले. त्यामुळे शाळा बंद करण्यात आली असून पालक विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले. तसेच आता घरीच अभ्यास करून परीक्षा देणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.पालक व मुलांचा विरोध

निवासी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या कारवाईसाठी विरोध केला. आम्ही पूर्ण पैसे भरले आहेत. तसेच आता परीक्षा देखील तोंडावर आहे. अशा परिस्थितीत आम्ही अभ्यास कुठे करायचा असा सवाल उपस्थित करत विद्यार्थी व पालकांनी या कारवाईला विरोध केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण