शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

पिंपरी चिंचवडमधील वायसीएम हॉस्पिटलच्या आवारात बांधण्यात येणार बहुमजली इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 13:38 IST

संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या आवारात बहुमजली इमारत बांधण्यात येणार असून ५० कोटी रूपयांच्या सुधारीत खर्चाला सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली.

ठळक मुद्देपदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सुरूवातीला पाच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताकामासाठी ५० कोटी रुपये सुधारीत अर्थसंकल्पीय रक्कमेची आवश्यकता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सुरूवातीला पाच कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता बहुमजली इमारत बांधण्यात येणार असून ५० कोटी रूपयांच्या सुधारीत खर्चाला सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली. या शिवाय नाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरिडॉरमध्ये सुदर्शननगर चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यासाठी २० कोटी आणि तळवडे जकात नाका ते देहूगाव रस्ता विकसित करण्यासाठी ३० कोटी अशा एकूण १०० कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण अशी आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात पाच कोटी रूपयांची तरतूद केली असून सर्वसाधारण सभेत २० जूनला या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वायसीएम रूग्णालयासाठी राज्य सरकारने वाढीव ०.५० चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आर्किर्टेक्ट शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएशन यांना सुधारित नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात रूग्णालय आवारात बहुमजली वाहनतळ, कॅन्टीन, नाईट शेल्टर तसेच इतर आवश्यक कामांसह शस्त्रक्रिया संकुलाच्या एकत्रित आराखड्याचा समावेश आहे. या कामासाठी ५० कोटी रुपये सुधारीत अर्थसंकल्पीय रक्कमेची आवश्यकता आहे. हे काम तातडीने करायचे असल्याने महापालिकेची सुधारीत प्रशासकीय मान्यता गरजेची आहे. 

 

सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटरनाशिक फाटा ते वाकड बीआरटी कॉरीडॉरअंतर्गत सुदर्शननगर चौकात सद्यस्थितीत सिग्नल व्यवस्था आहे. प्रवासी वाहतुक वेळेत बचत होऊन प्रदुषण कमी होण्यास मदत व्हावी, यासाठी चौक सिग्नल मुक्त करण्यासाठी ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामास महापालिकेच्या सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी २० कोटी रुपये प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.

 

भूसंपादनासाठी तीस कोटीतसेच तळवडे जकात नाका ते देहूगाव कमानीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच भूसंपादन होणार आहे. जागेचे संपादन झाल्यास रस्ता विकसित करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी हे कामही महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात विशेष योजना या लेखाशिर्षाखाली समाविष्ट केले आहे. या कामासाठी ३० कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी १०० कोटी रूपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता द्यावी, असे आयुक्तांनी प्रस्तावात नमूद केले. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

 

ट्रस्टची जागा रस्ता म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मागे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८-मासुळकर कॉलनी हा भाग अत्याधुनिक सोयीने विकसित होत आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व मुख्य रस्त्यावर होणाठया गाड्यांच्या वाहतुकीस पर्यायी उपलब्धता होणे अत्यंत गरजेचे आहे. टेल्को सिमाभिंती लगतचा रस्ता ते मोरवाडी आयटीआय रस्ता येथील अमृतेश्वर ट्रस्टची जागा नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी रस्ता म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार, आयुक्तांनी फ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग कार्यकारी अभियंता आणि अमृतेश्वर ट्रस्ट यांच्या सहमतीने हा पर्यायी रस्ता करण्यात आला. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार हा रस्ता घोषीत करण्याकरिता नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर एक हरकत आली. हरकतदारास सुनावणीस बोलावूनही अनुपस्थित राहिल्याने हरकत फेटाळली आहे. त्यानुसार, ही जागा रस्ता म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर दाखल होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विषयपत्र माघार घेत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. त्यामागील गौडबंगाल कायम आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य