कचरा समस्या तीन महिन्यांत सुटणार - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:53 AM2017-08-10T02:53:02+5:302017-08-10T02:53:02+5:30

कचरा व्यवस्थापनाबाबत आणि निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत शहरातील कचरा समस्या आणि आरोग्य प्रश्न सोडविण्यात यश येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Waste problem will last three months - Shravan Herdkar | कचरा समस्या तीन महिन्यांत सुटणार - श्रावण हर्डीकर

कचरा समस्या तीन महिन्यांत सुटणार - श्रावण हर्डीकर

Next

पिंपरी : कचरा व्यवस्थापनाबाबत आणि निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत शहरातील कचरा समस्या आणि आरोग्य प्रश्न सोडविण्यात यश येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्याचा आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची कबुली त्यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाबाबत महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेतही चर्चा झाली आहे. महापालिकेच्या वतीने नियुक्त केलेल्या संस्था नियमितपणे घरोघरचा कचरा उचलत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. कचरा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती. त्याबाबत आयुक्त म्हणाले, ‘‘आरोग्याविषयी नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारी आल्या आहेत. मनुष्यबळ कमी पडत आहे. तसेच गाड्यांची कमतरता आहे. यापूर्वी कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रिया आणि कामातही त्रुटी होत्या. त्या दूर करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू झालेले आहे. कचरा प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. नवीन निविदा प्रक्रिया होऊन येत्या तीन महिन्यांत हा प्रश्न सुटेल.’’
दरम्यान, शहरातील अनेक भागामध्ये कचरा गाड्या वेळेत येत नाहीत. त्यामुळे दारापुढेच कचरा पडलेला असतो. तसेच अनेक वेळा रस्त्यावरील कचरा उचलणाºया गाड्याही नियमित धावत नाहीत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने हाही प्रकल्प व्यवस्थित सुरू नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. प्रशासनाने आरोग्याच्या दृष्टीने कचºयाची समस्या त्वरित सोडवावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या तक्रारीची चौकशी पूर्ण
पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, त्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. आपण कायदेशीर कारवाई करणार का, या प्रश्नावर आयुक्त म्हणाले, ‘‘टक्केवारीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयात केलेल्या तक्रारीबद्दल संबंधितांना नोटीस पाठविली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर न केल्याने याबाबतचा अहवाल तयार करून पंतप्रधान कार्यालयास कळविले आहे. ही तक्रार मोघम स्वरूपाची आहे, असे आम्ही यापूर्वीच म्हटले होते. बदनामीविषयी कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरविलेले नाही.’’

महिलांबाबतच्या तक्रारींचीही चौकशी
महापालिका प्रशासनातील महिलांनी केलेल्या तक्रारींविषयी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहे, या प्रश्नावर आयुक्त म्हणाले, ‘‘महापालिकेतील कर्मचारी महिलांनी कोणाविषयी तक्रार केल्यानंतर या विषयी असणाºया समितीमार्फत चौकशी केली जाते. त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्यास पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, म्हणून नियमावली तयार केली आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकाºयांना या विषयी प्रशिक्षणही देण्यात येते. महिलांची प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेतली जाते.’’

Web Title: Waste problem will last three months - Shravan Herdkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.