कामशेत खिंडीत भरधाव कंटेनर पलटी; वाहतूक संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:34 IST2018-01-09T11:29:34+5:302018-01-09T11:34:46+5:30
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला.

कामशेत खिंडीत भरधाव कंटेनर पलटी; वाहतूक संथगतीने
कामशेत : जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मंगळवार दि. ९ रोजी सकाळी ८-३० वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर (एमएच ४६ एएफ ९६६४) कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनर (एमएच ०६ के ६४३१) वर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला.
दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्याने महामार्गाच्या कडेने संथ गतीने वाहतूक सुरू आहे. या अपघातात कंटेनर (एमएच ०६ के ६४३१) चालक महादेव देसाई ( रा. ता. तासगाव ) याच्या डोळ्याला किरकोळ मार लागला आहे. घटनास्थळी कामशेत पोलीस दाखल झाले असून वाहने हटवणे व पुढील कारवाई सुरू आहे.