पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 19:41 IST2019-10-23T19:36:18+5:302019-10-23T19:41:19+5:30

आरोपी हे फिर्यादी महिलेच्या मुलाचे मित्र आहेत.

molestation of women by son friend due to money dispute | पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

पिंपरी : पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राने महिलेचा विनयभंग केला. तसेच कारची तोडफोड केली. ही घटना पिंपरीगाव येथे मंगळवारी (दि. २२) सायंकाळी घडली.दिगंबर ज्ञानोबा कुदळे (वय 29), नितीन क्षिरसागर (दोघेही रा. जगदंबा स्वीटजवळ, पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी हे फिर्यादी महिलेच्या मुलाचे मित्र आहेत. त्यांच्यात उसने पैसे घेण्यावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण केली. तसेच विनयभंग करीत मोटारीची तोडफोडही केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: molestation of women by son friend due to money dispute