अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 18:28 IST2018-04-09T18:28:55+5:302018-04-09T18:28:55+5:30

तू मला फार आवडतेस, मी तुझे दुसरे कोणाबरोबर लग्न होऊन देणार नाही. तुझे घरचे लोकांना आपले दोघांचे लफडे आहे असे सांग’, असे बोलून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दमदाटी...

Molestation of minor girl, FIR filed on one | अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

चाकण : ‘तू मला फार आवडतेस, मी तुझे दुसरे कोणाबरोबर लग्न होऊन देणार नाही. तुझे घरचे लोकांना आपले दोघांचे लफडे आहे असे सांग’, असे बोलून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दमदाटी करून विनयभंग केल्या प्रकरणी चाकण येथील महात्मा फुके नगर मधील एकावर आज ( दि. ९ ) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम शिवाजी जगताप ( रा. महात्मा फुलेनगर, चाकण, ता.खेड, जि.पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनांक ३० मार्च ते ९ एप्रिल दरम्यान प्रेम हा या मुलीचा महात्मा फुलेनगर ते शिवाजी विद्यालय दरम्यान छुपा पाठलाग करीत होता. दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महात्मा फुलेनगर येथील प्रसाधन गृहाजवळ अडवून त्याने या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४४/२०१८, भादंवि कलम ३५४ (ड), बाललैंगिक अत्याचार कायदा कलम २०१२ चे ११ व १२. नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे पुढील तपास करीत आहेत.. 

Web Title: Molestation of minor girl, FIR filed on one