Pimpri Chinchwad: घटस्फोटित असल्याचे सांगत लष्कराच्या जवानाकडून बलात्कार, गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Updated: February 3, 2024 19:06 IST2024-02-03T19:05:47+5:302024-02-03T19:06:12+5:30
पिंपरी : घटस्फोट झाल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार प्रकरणी लष्कराच्या जवानावर गुन्हा दाखल केला. ही घटना जून ...

Pimpri Chinchwad: घटस्फोटित असल्याचे सांगत लष्कराच्या जवानाकडून बलात्कार, गुन्हा दाखल
पिंपरी : घटस्फोट झाल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार प्रकरणी लष्कराच्या जवानावर गुन्हा दाखल केला. ही घटना जून २०२० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडली. प्रदीप तुकाराम जाधव (४०, रा. वाळवा, सांगली) असे गुन्हा दाखल केलेल्या जवानाचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. २) दिघीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हा भारतीय लष्करामध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे. दरम्यान, त्याने विवाह जुळणाऱ्या वेबसाईटवरून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. आपला घटस्फोट झाला आहे, असे सांगून त्याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.