मोाबईल चोरट्यांना मुद्देमालासह अटक
By Admin | Updated: April 28, 2017 05:53 IST2017-04-28T05:53:21+5:302017-04-28T05:53:21+5:30
मोबाईल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून ५२ मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली

मोाबईल चोरट्यांना मुद्देमालासह अटक
पिंपरी : मोबाईल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून ५२ मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी पहाटे गस्तीवरील पोलिसांनी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यंशवत ऊर्फ गोंड्या बाळू वाघमारे (वय १८) आणि तालिफ ऊर्फ मिरची वली शेख (वय १८, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे ५२ मोबाईल संच आढळून आले. पिंपरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संत तुकारामनगर पोलीस चौकीतील बीट मार्शलचे पोलीस कर्मचारी घाडगे, कुंभार, हवालदार खेडकर, महिला शिपाई पाटील यांनी ही कामगिरी केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)