शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित पोलिसावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; दिघीत नऊ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 14:52 IST

सोनके हे पुणे शहरातील चंदन नगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून ते सध्या निलंबित आहेत.

पिंपरी : टोळक्याने निलंबित पोलिसावर हल्ला केला. दगड मारून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दिघी येथे मंगळवारी (दि. २७) रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. 

परमेश्वर तुकाराम सोनके (वय ४१, रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी मंगळवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनिकेत हेमराज वाणी (वय २१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), सुरज खिलारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल आघाम, राहुल जाधव व इतर दोन अनोळखी साथीदार, असे नऊ जणांच्या विरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनके हे पुणे शहरातील चंदन नगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून ते सध्या निलंबित आहेत. मित्राच्या बहिणीचा साखरपुडा ठरवण्यासाठी ममता चौक येथून ते जात होते. त्यावेळी रस्त्याच्या मध्यभागी थांबून आरोपी आरडाओरडा करत होते. फिर्यादी यांनी त्यांना समजावून सांगितले व तेथून जाण्यास सांगितले.त्यानंतर फिर्यादी हे दिघी जकात नाका जवळ गेले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांची गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. 

फिर्यादी हे दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांनी आरोपी अनिकेत वाणी याला यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात पकडले होते. त्याचा राग मनात ठेवून फिर्यादीला दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी सोनके हे गंभीर जखमी झाले. तसेच दगड मारून गाडीचेही नुकसान केले. तुला संपवूनच टाकतो, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी जोरजोराने शिवीगाळ करत दहशत माजवत त्यांच्या दुचाकीवरून निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे तपास करीत आहेत.

टॅग्स :dighiदिघीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस