शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले..! पिंपरीत १०० जणांच्या टोळक्याचा धुडगूस; तलवार, कोयत्याने वाहनांची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 11:59 IST

पिंपरीतील नेहरूनगर येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला..

ठळक मुद्दे१०० जणांविरोधात गुन्हा दाखल 

पिंपरी : धुडगूस घालत टोळक्याने दगडफेक करून तलवार कोयता यासारख्या हत्यारांनी वाहनांची तोडफोड केली. तसेच एकावर हल्ला करून दहशत निर्माण केली. पिंपरीतील नेहरूनगर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी १०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आशिष जगधने (वय ३१), इरफान शेख (वय ३०), जितेश मंजुळे (वय २८), जावेद औटी (वय २९), आकाश हजारे (वय ३०) तसेच इतर ९५ साथीदार यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नीलेश सुभाष जाधव (वय ३५, रा. नेहरू नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे त्यांच्याकडील लॅपटॉप त्यांच्या चारचाकी वाहनात ठेवायला गेले असताना आरोपी चारचाकी वाहनातून तसेच दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्याकडे तलवारी, कोयते, लाकडी दांडकी, बॅट, चॉपर, सिमेंटचे ब्लॉक व वीटा होत्या. हा होता का, अरे याला आता आपण जिवंत सोडायचे नाही, याला संपवून टाकू, असे म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. दम असेल तर बाहेर या, असे म्हणत आरोपी यांनी आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे कोणीही फिर्यादी यांच्या मदतीला आले नाही. लोक तेथून सैरावैरा पळून गेले. स्थानिक लोकांनी आपापली दुकाने बंद करून घेतली. आरोपींनी तेथे पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी यासह इतर गाड्या फोडून नुकसान केले.

---------

पोलीस आयुक्तांची घटनास्थळी भेट चिंचवड येथील वाहन तोडफोडीची घटना ताजी असतानाच पिंपरीत असाच प्रकार घडला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याची गंभीर दखल घेतली असून घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी जलद तपास करून आरोपींना त्वरित अटक करून कारवाईबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcommissionerआयुक्त