शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार महेश लांडगे यांची पिंपरी -चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:13 IST

आमदार लक्ष्मण जगताप यांचा  अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने तीन महिन्यांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरू होती..

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया सुरू पक्षाने सोपविलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार

पिंपरी : विधानसभा निवडणुकीमुळे  लांबणीवर पडलेली भाजपा शहराध्यक्ष निवड आज जाहिर झाली.  एकमेव अर्ज आल्याने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिर केली.विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील काही शहरांचे अध्यक्ष निवडले गेले. मात्र, पिंपरी-चिंचवडची निवड झाली नव्हती. आमदार लक्ष्मण जगताप यांचा  अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने तीन महिन्यांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया सुरू होती. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी आमदार लांडगे यांचा एकमेव अर्ज आला. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी लांडगे यांची बिनविरोध निवड जाहिर केली.यावेळी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लोक लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर तुषार हिंगे, निवडणूक अधिकारी मोरेश्वर शेडगे, प्रदेशच्या उमा खापरे, सरचिटणीस अमोल थोरात, श्ैला मोळक, रवी लांडगे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.लोकमतचे वृत्त ठरले खरेभाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराध्यक्ष पद दोन्ही आमदारांपैकी एकाने भूषवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शहरातील दोन आमदारांपैकी जगताप यांनी एकदा पद भूषविल्याने ते पुन्हा हे पद भूषविण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांची मते चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतली. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनीच पद भूषवावे, अशी अनेकांनी मते मांडली. याबाबतचे भाजपाच्या शहराध्यक्षपदी महेश लांडगे असे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते. लोकमतचे वृत्त खरे ठरले आहे.आमदार महेश लांडगे म्हणाले, पक्षाने सोपविलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. संघटनवाढीबरोबरच महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस