शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक

By प्रकाश गायकर | Updated: October 26, 2023 19:20 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू

पिंपरी : मराठा समाजास आरक्षण दिल्याशिवाय मंत्री, आमदार व खासदार यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा गुरूवारी (दि. २६) दुसरा दिवस होता.

उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहत मराठा बंधू भगिनी व इतर समाजाच्या संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. उपोषणस्थळी कामगार नेते कैलास कदम, कामगार नेते काशिनाथ नखाते, हरीष मोरे, मारुती भापकर, सुभाष साळुंखे, अरूण पवार, गौतम चाबुकस्वार, मनोज गरबडे, राजाभाऊ गोलांडे, विलास भालेकर, कल्पना गिड्डे, विष्णुपंत तांदळे, राजेंद्र कुंजीर, उदयसिंह पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची उपोषण स्थळी बैठक झाली. यावेळी मराठा समाजास कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय कोणत्याही आमदार, खासदार व मंत्र्यांनी शहरात जाहीर कार्यक्रम घेऊ नये अन्यथा हा कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संविधानिक मार्गाने उधळण्यात येईल असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला.

आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा इरादा

सरकार मराठा समाजाच्या मागणीबाबत टाळाटाळ करत आहे. हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा इरादा आहे अशा तीव्र स्वरूपाच्या भावना उपस्थितांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण