पिंपरी : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील एका कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या खोकल्यावरील औषधांचा १३ लाखांचा मोठा साठा जप्त केला. यात १९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) ही कारवाई केली.
औषध प्रशासनाचे पुणे येथील सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी याबाबत माहिती दिली. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधाचे सेवन केल्याने बालके दगावल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याचा अन्न व औषधे प्रशासन विभाग सतर्क झाला असून राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची तपासणी केली जात आहे. त्याच बरोबर मेडिकल आणि सरकारी रुग्णालयातील खोकल्याच्या औषधांचे देखील नमुने घेतले जात आहेत. मध्यप्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय व्यत केला जात आहे त्या औषधाचा साठा महाराष्ट्र राज्यात नाही. मात्र, गुजरातमध्ये काही कंपन्यांमधील औषधांचे नमुने तपासण्या आले. त्यात काही घटक योग्य नसल्याचे समोर आले. त्यामुळे ही औषधे प्रतिबंधित करण्यात येत आहेत. त्यासाठी खबरदारी म्हणून औषधांच्या उत्पादक कंपन्यांमध्ये तपासणी केली जात आहे, असे हुकरे यांनी सांगितले.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तज्ज्ञ डाॅक्टरांनी लिहून दिलेली औषधे घ्यावीत. दोन वर्षांखालील लहान चिमुकल्यांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप दिले जाऊ नऊ, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. - गिरीश हुकरे, सह आयुक्त, औषध प्रशासन, पुणे
Web Summary : Pune FDA seized ₹1.3 million worth of cough syrup from a company following concerns about child deaths linked to cough medicines. Nineteen samples are being tested as a precautionary measure. Citizens are advised to consult doctors and avoid giving cough syrup to children under two years old.
Web Summary : खांसी की दवाओं से बच्चों की मौत की आशंका के बाद पुणे एफडीए ने एक कंपनी से 13 लाख रुपये की खांसी की दवाई जब्त की। एहतियात के तौर पर उन्नीस नमूनों का परीक्षण किया जा रहा है। नागरिकों को डॉक्टरों से परामर्श करने और दो साल से कम उम्र के बच्चों को खांसी की दवाई देने से बचने की सलाह दी जाती है।