शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

महापौर राहुल जाधव यांना सामोरे जावे लागले स्थानिक नागरिकांच्या रोषाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 02:53 IST

पाहणी दौऱ्यादरम्यानचा प्रकार; रावेत येथील स्मशानभूमीला स्थानिक नागरिकांचा विरोध

रावेत : महापौर राहुल जाधव शहरातील स्मशानभूमी आणि दशक्रिया घाटांचा पाहणी दौरा करीत आहेत. या अनुषंगाने महापौर राहुल जाधव यांनी रावेत येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या प्राधिकरणातील सेक्टर ३२ अ मधील स्मशानभूमी बांधकामास भेट दिली. या वेळी येथील रहिवाशांनी याला विरोध केल्याने महापौरांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.राहुल जाधव यांनी स्मशानभूमी पाहणी दौºयांतर्गत रावेत येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीची महापालिका अधिकाºयांसह पाहणी केली. या वेळी परिसरात राहणाºया शेकडो महिला आणि नागरिकांनी येथे स्मशानभूमी करू नये अशी मागणी करीत नियोजित स्मशानभूमीच्या कामाला विरोध केला. महापौरांसोबत नागरिकांनी याबाबत सविस्तर चर्चा केली. नगरसेविका संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर उपस्थित होत्या. वास्तुशास्त्रानुसार घराजवळ स्मशानभूमी असू नये, ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. रावेतकरांना बहुप्रतीक्षित स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक ३२ अ मधील जाधव घाटाजवळच्या आरक्षित जागेवर अत्याधुनिक गॅसवरील शवदाहिनीसह स्मशानभूमी विकसित होणार आहे. मात्र, या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. रावेत, प्राधिकरण, शिंदे वस्ती, वाल्हेकरवाडी आदी भागांतील नागरिकांना रावेत येथील पंपिंग स्टेशन, निगडी किंवा चिंचवड येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते. अपुºया सोयीसुविधांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.स्मशानभूमी दृष्टिक्षेपात...नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्र. ३२ अ मधील वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आधुनिक शवदाहिनीकामाचा आदेश -१९ जून २०१८कामाची मुदत - १८ महिनेक्षेत्र -पेठ क्र. ३२ अ मधील आरक्षण क्र. ५९६ जागेचे एकूण क्षेत्र ९१२५.६० चौरस मीटरखर्च - ४ कोटी ६२ लाख ४८३ रुपयेकामावरील सर्व खर्च प्राधिकरण देणारनवनगर विकास प्राधिकरणाने महापालिकेकडे स्मशानभूमी बांधून मिळण्यासाठी विनंती केली़सीमाभिंत, अंतर्गत लँडस्केपिंग, रस्ते, इमारत, मुख्य प्रवेशद्वार, टॉयलेट, वाचमन केबिन आदी बाबींचा स्थापत्यविषयक कामकाजाचा समावेशसदरची शवदाहिनी ही वायुनियंत्रण यंत्रणेसह गॅसवर आधारित आहे.महापालिकेच्या माध्यमातून रावेत परिसरासाठी अत्याधुनिक सुविधेची पर्यावरणपूरक स्मशानभूमी आणि उच्च प्रतीचे गार्डन तयार करण्यात येणार आहे. नागरिकांचा विरोध होणे साहजिक आहे. परंतु येथील विकास करताना निश्चित नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. रहिवाशांच्या दृष्टीने स्मशानभूमीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.- राहुल जाधव, महापौर१९९५च्या विकास आराखड्यानुसार स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. हे काम पालिकेला दिले असून, ३ कोटी रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण होईल. स्मशानभूमीला चोहोबाजूंनी उंच संरक्षण भिंत बांधणार आहोत. तशी सूचना महापालिकेला दिली आहे.- सतीशकुमार खडके, मुख्य अधिकारी, प्राधिकरणपरिसरात अत्याधुनिक स्मशानभूमी होत आहे, ही सर्वांसाठी चांगली गोष्ट असली, तरी स्थानिकांना याचा त्रास आयुष्यभर होणार आहे. नागरिकांचा याला विरोध होणे रास्त आहे. स्थानिकांना त्रास होत असेल, तर माझाही याला विरोध असेल. यामुळेच मी महापौरांच्या भेटी दरम्यान अनुपस्थित राहिलो.- मोरेश्वर भोंडवे, राष्ट्रवादी, नगरसेवकआम्ही घर घेताना प्राधिकरणाचा भाग असल्याने येथे घेतले आहे. पाच वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत. इमारतीसमोरील प्राधिकरणाच्या जागेत स्मशानभूमीचे आरक्षण आहे. याबाबत आम्हाला प्रशासनाने कोणतीच पूर्वकल्पना दिली नाही. रहिवासी झोनपासून केवळ ३० मीटर अंतरावर स्मशानभूमी असणे हे कोणत्या नियमानुसार आहे. आमच्या व कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. प्राधिकरण भागात घर घेण्याच्या आमच्या उद्देशाला प्रशासनाने हरताळ फासला आहे.- अर्चना सुराणा, हार्मोनी सोसायटी, रावेतरहिवाशांच्या दृष्टीने स्मशानभूमी घातक आहे. स्मशानभूमी बाबत आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही येथे लाखो रुपये घालून घर घेतले. येथील स्मशानभूमीला आमचा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे स्मशानभूमी होऊ देणार नाही.- सुनील सावंत, अध्यक्ष,पवनी प्राइड सोसायटी, रावेतपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची ही जागा असून, या जागेवर प्राधिकरणाचे स्मशानभूमीचे आरक्षण आहे. हे आरक्षण विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रस्तावित खर्चातील काही रक्कम प्राधिकरणाने महापालिकेकडे वर्ग केला आहे. रद्दबाबतचा निर्णय प्राधिकरण प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.- हरविंदरसिंग बन्सल,अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिकातीन हजार नागरिकांचा विरोधया स्मशानभूमीत वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणा असेल. या कामाची जबाबदारी महापालिकेकडे असेल. या कामाचा खर्च प्राधिकरण करणार असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होईल. स्मशानभूमी ही परिसरातील नागरिकांच्या सोईसाठी असली, तरी तिला शेजारील ला कासीटा, पवनी प्राइड, हार्मोनी, ध्रुव सिद्धी, रॉयल व्हीजन, ब्लूमिंग डिल, रिद्धी सिद्धी या सोसायट्यांतील जवळपास तीन हजार नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत नगरसेविका संगीता भोंडवे आणि प्रज्ञा खानोलकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.बांधकाम व्यावसायिकाने ठेवले अंधारातसेक्टर ३२ मध्ये काही वर्षांपूर्वी विविध व्यावसायिकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या. नव्याने विकसित होणारा आणि शांत परिसर म्हणून अनेकांनी या भागाला पसंती देत लाखो रुपये देऊन घरे घेतली. व्यावसायिकाने येथील आजूबाजूला असलेल्या आरक्षणाबाबत पुसटशीसुद्धा कल्पना येथे घर देणाºयाला सांगितले नाही. आता येथे स्मशानभूमीचे काम सुरू केल्यानंतर रहिवाशांना याबाबत समजल्यावर बांधकाम व्यावसायिकांनी आमचा केसाने गळा कापला, असे येथील रहिवाशांमध्ये चर्चा आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौरBJPभाजपा