महापौर भोसरीचा की चिंचवडचा ? आरक्षणाची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:01 PM2019-08-08T21:01:49+5:302019-08-08T21:02:37+5:30

महापौरपद भोसरीला मिळणार की चिंचवडला याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे... 

Mayor Bhosari's or chinchwad ? Awaiting reservation | महापौर भोसरीचा की चिंचवडचा ? आरक्षणाची प्रतिक्षा

महापौर भोसरीचा की चिंचवडचा ? आरक्षणाची प्रतिक्षा

googlenewsNext

पिंपरी : नागरिकांचा मागासवर्ग प्रवगार्साठी आरक्षित असणाऱ्या महापौरपदाचा कालखंड पुढील महिन्यांत पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन आरक्षण कोणते असणार याबाबत उत्सुकता आहे. आरक्षणावर पुढील महापौर कोण होणार हे ठरणार आहे. महापौरपद भोसरीला मिळणार की चिंचवडला याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग हे होते. त्यानुसार महापालिकेत सुरूवातीला भाजपाने आमदार महेश लांडगे समर्थक चऱ्होलीचे नगरसेवक नितीन काळजे यांना संधी दिली. त्यानंतर सव्वा वर्षांच्या कालखंड पूर्ण होताच, चिखलीचे नगरसेवक राहूल जाधव यांना महापौरपदी संधी दिली. पहिल्या वर्षी नितीन काळजे यांना संधी दिल्याने मूळ ओबीसी आणि भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सव्वा वषार्नंतर राहूल जाधव यांच्या निवडीनंतरही भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नव्या जुण्यांचा वाद समोर आला होता.
 

निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू  
अडीच वर्षांपूर्वी महापौरपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. येत्या १३ सप्टेंबरला महापौरपदाचा कालखंड पूर्ण होत आहे. तत्पूर्वी महापौरपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक विभागाने माहिती मागविली असून ७ आॅगस्टपर्यंत माहिती शासनाकडे पाठविली आहे.  त्यामुळे पुढील आठवड्यात आरक्षण काढण्यात येईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून समजते. विद्यमान महापौर १३ सप्टेंबरपर्यंत पदावर कार्यरत असणार आहेत. 
 

ओबीसी वगळता अन्य कोणतेही आरक्षण
विद्यमान महापौर ओबीसी प्रवगार्तील असल्याने ओबीसी वगळून अन्य प्रवगार्चे आरक्षण काढण्यात येणार आहे. तसेच आजपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत एससी प्रवगार्चा महापौर झालेला नाही. हा प्रवर्ग किंवा अन्य कोणत्याही प्रर्वगार्चे आरक्षण पडू शकते. चिठठ्या टाकून आरक्षण काढण्यात येणार आहे. 
 

महापौरपद भोसरीला मिळणार की चिंचवडला 
आरक्षण कोणते निघणार यावर पुढील महापौर कोण होणार हे ठरणार आहे. अडीच वर्षे महापौरपद भोसरी विधानसभेकडे होते. त्यामुळे नवीन आरक्षण कोणत्या प्रवगार्चे निघते. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर   चिंचवड, पिंपरी की भोसरी यापैकी कोणत्या विधानसभा मतदार संघास महापौरपद मिळणार याबाबत उत्सुकता असणार आहे. तसेच शहरातील आमदार समर्थकांना संधी देणार की? पक्षातील निष्ठावान सदस्यांना संधी मिळणार याबाबत आरक्षणानंतरच निर्णय होणार आहे.   आगामी महापौर कोण असणार याबाबत महापालिका वतुर्ळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


 

Web Title: Mayor Bhosari's or chinchwad ? Awaiting reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.