घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 16:32 IST2019-11-09T16:30:54+5:302019-11-09T16:32:09+5:30
सासरच्या मंडळींनी घरगुती कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. ही घटना मे २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत साखरवाडी, ता. फलटण येथे घडली.

घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ
पिंपरी : सासरच्या मंडळींनी घरगुती कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. ही घटना मे २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत साखरवाडी, ता. फलटण येथे घडली. याप्रकरणी विवाहित महिलेनी पोलिसात धाव घेत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुनिल सुभाष धोत्रे, सचिन धोत्रे, सुशिला सुभाष धोत्रे (रा, साखरवाडी, फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा मे २०१६ मध्ये सुनिल धोत्रे यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर सासरच्या मंडळीनी घरगुती कारणांवरून त्यांचा छळ केला. वारंवार त्यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.