पिंपरीत विवाहितेने केली आत्महत्या

By Admin | Updated: March 6, 2016 01:05 IST2016-03-06T01:05:14+5:302016-03-06T01:05:14+5:30

पिंपरीगाव येथे राहणाऱ्या २२वर्षीय विवाहितेने घरातील लोखंडी पाइपला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

Married woman committed suicide in Pimpri | पिंपरीत विवाहितेने केली आत्महत्या

पिंपरीत विवाहितेने केली आत्महत्या

पिंपरी : पिंपरीगाव येथे राहणाऱ्या २२वर्षीय विवाहितेने घरातील लोखंडी पाइपला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीगावात राहणाऱ्या प्रियंका शर्माप्पा अपचंदे या महिलेने आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. प्रियंका नवविवाहित असून, तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पिंपरी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
विवाहिता आत्महत्या प्रकरणे वाढल्याने परिसरातून चिंता व्यक्त
होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Married woman committed suicide in Pimpri