पिंपरी : घरात वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी तसेच फ्रिजकरिता माहेरहून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी रहाटणी येथील विवाहितेने सात जणांविरुद्ध वाकड पोलिसांकडे शनिवारी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांकडे आशीर्वाद कॉलनी रहाटणी येथे राहणाऱ्या विवाहितेने पतीसह सासू, सासरे, नणंद, जाऊबाई यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. अविनाश जोतिराम खामकर, जोतिराम मोतीराम खामकर, पुष्पा जोतिराम खामकर, पंकज खामकर, तेजस्विीनी खामकर, मकरंंद खामकर, पूजा खामकर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विवाहितेने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी तिने सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
विवाहितेचा छळ सात जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 02:13 IST