शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी महेश लांडगे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 18:34 IST

नवीन वर्षात भाजपात खांदेपालट : आमदारांसाठी पक्षश्रेष्ठी आग्रही

ठळक मुद्देआमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर महेश लांडगे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा

पिंपरी : विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवडभाजपा अध्यक्ष निवड लांबणीवर पडली होती. येत्या दोन दिवसांत अध्यक्ष निवडला जाणार असून विद्यमान आमदारांपैकी एकाने जबाबदारी घ्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठी आग्रही आहेत. विद्यमान शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर महेश लांडगे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे सरकार स्थापन केल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर जगताप यांनी पक्षबांधणीसाठी जोर लावला होता. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह समर्थकांनी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत  जगताप आणि लांडगे यांच्या जोडीने ताकद लावल्याने तीन सदस्यांवरून भाजपाची सदस्य संख्या ७७ वर गेली.राष्ट्रवादी सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने आमदार जगताप यांनाच संधी देणार की नवीन सदस्यांचा विचार करणार? याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील काही शहरांचे अध्यक्ष निवडले गेले. मात्र, पिंपरी-चिंचवडची निवड झाली नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शहरातील सहा गटांतील सुमारे बाराशे बूथ कमिट्यांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर यामधूनच अध्यक्ष निवड करण्यात येते.........जगताप अनुत्सुक असल्याची चर्चाभाजपा शहराध्यक्षपदी दमदार नेतृत्व असावे, असा आग्रही भाजपातील ज्येष्ठ नेत्यांचा आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांप्ौकी एकाचा विचार होणार आहे. आमदार जगताप यांनी शहराध्यक्षपद भूषविल्याने ते हे पद पुन्हा घेण्यास अनुत्सुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी शहराध्यक्षपद भूषवावे, यासाठी पक्ष आग्रही आहे. त्यामुळे महेश लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. ...........जुन्यांची मोर्चेबांधणीभाजपा शहराध्यक्षपदी जुन्यांचीही वर्णी लागावी, यासाठी भाजपातील एक गट आग्रही आहे. प्रदेशच्या नेत्या आणि माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे आणि सरचिटणीस अमोल थोरात यांच्याही नावांची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या नावाबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. येत्या दोन दिवसांत अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLakshman Jagtapलक्ष्मण जगतापBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस