शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले शाळा स्थलांतराला विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:07 IST

प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपालिका मुख्यालयासमोर शाळा भरवत आंदोलन सुरु शाळा स्थलांतराविरुद्ध पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला विरोधकांचा पाठिंबाशाळा दळवीनगर येथील रेल्वे लाईन परिसरातील  असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित

पिंपरी : विद्यार्थ्यांना वा-यावर सोडून महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील  महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे पालिकेने शाळेला सील ठोकले. या शाळा स्थलांतराला विरोध करण्यासाठी पालिका मुख्यालयासमोर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गात ठिय्या मांडत आंदोलन केले. सध्या महापालिकेसमोरच शाळा सुरु आहे.या शाळा स्थलांतराविरुद्ध पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, योगेश बाबर, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक नाना काटे, छावा क्रांतीवर सेनेचे राजेंद्र पडवळ, हे आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे. शाळेतील साहित्य देखील हलविण्यात आले आहे. परंतु, याला विद्यार्थ्यांसह पालकांचा तीव्र विरोध आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलकांच्या भूमिकेत आहे.परंतु,त्यांच्या मागणीकडे सत्ताधारी आणि प्रशासनाने दुर्लक्ष करत ही शाळा दळवीनगर येथील रेल्वे लाईन परिसरातील  असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा  सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही, असे पालकांचे मत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी सरकारने विद्यार्थ्यांना वा-यावर सोडू नये. महात्मा फुले शाळेत वर्ग सुरू ठेवावेत, अशी आग्रही मागणी पालकांची आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाBJPभाजपाStudentविद्यार्थीTransferबदली