शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मावळात सुनील शेळकेंचा ‘मास्टरस्ट्रोक’...! तेरा संचालकांचे राजीनामे, बाजार समिती बरखास्त होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:41 IST

Maharashtra market committee - तेरा संचालकांचे राजीनामे, मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती अल्पमतात

वडगाव मावळ : आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रवादीच्या १३ संचालकांपैकी सोमवारी ९ आणि मंगळवारी ४ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अल्पमतात आली आहे. लवकरच बाजार समिती बरखास्त होणार? याबाबतची चर्चा मावळात रंगली आहे. याबाबतचा निर्णय दि. ९ ला होणार असल्याची चर्चा आहे.

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ पैकी १३ सदस्य होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे ५ संचालक असताना सभापतीपदी भाजपचे सुभाष जाधव हे विजयी झाले होते. सभापतीपद भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता होती. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी नवी खेळी खेळली. तेरा संचालकांना पदाचे राजीनामे देण्याची सूचना केली. राजीनामा न दिल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे आजअखेर सर्व १३ संचालकांनी पदाचे राजीनामे सहायक निबंधक वडगाव मावळ येथे दिले आहेत. 

बाजार समितीच्या ९ एप्रिलच्या बैठकीकडे लक्ष

संचालकांनी वडगाव मावळ येथे सहायक निबंधक यांच्याकडे राजीनामे दिले असले तरी राजीनामे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे गेले तरी राजीनामे संचालकांच्या बैठकीतच ते मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे येत्या ९ तारखेला होणाऱ्या बाजार समितीच्या बैठकीत राजीनामाबाबत निर्णय होऊन राजीनामे मंजूर झाले तर बाजार समिती बरखास्त होईल किंवा आणखी कोणती राजकीय घडामोडी होऊ शकतात. यावर बाजार समितीचे भवितव्य अवलंबून आहे. दोन वर्षाचा कार्यकाल शिल्लक असताना त्यामुळे राष्ट्रवादी बाजार समितीची सत्ता सोडेल, असे चिन्ह सध्या दिसत नाही. त्यामुळे येत्या गुरुवारी राजकारण काय वळण घेईल? यावर बाजार समितीचे भवितव्य अवलंबून आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maval: Sunil Shelke's move! Market Committee faces potential dismissal.

Web Summary : MLA Sunil Shelke's directive led to 13 resignations from the Maval Agricultural Produce Market Committee after a BJP member won the chairmanship. The committee may be dismissed, pending a decision on April 9th. Political maneuvering is expected.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना