शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

Maharashtra Election 2019 : गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीचा राहुल कलाटे यांना पाठिंबा : अजित पवार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:50 IST

संधीसाधूपणाचे राजकारण करणाऱ्यांची गय करणार नाही...

ठळक मुद्देभाजपाने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडा  

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढली असून,  महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी कमी झाली नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत म्हणून पाठिंबा दिला आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मांडली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सर्वांगिण विकासासाठी राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कलाटे यांना राष्टÑवादी काँग्रेसने पुरस्कृत केल्याची भूमिका पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, रंगनाथ फुगे, वैशाली घोडेकर, कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने,अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप,  प्रवक्ते फजल शेख उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, भाजपाने शहराची वाट लावून टाकली आहे़ पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता प्रभागवार प्रचारयंत्रणा राबवावी. भाजपाने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडावीत, असे आवाहन पवार यांनी केले. ..........आयटी पार्कची कोंडी सोडविणार : राहुल कलाटे चिंचवडचा मतदार हा सुज्ञ आहे. विकास कोणी केला. कोणाच्या नेतृत्वाखाली झाला. ही येथील जनता जाणून आहे. संधीसाधूपणाचे राजकारण करणाऱ्यांची गय करणार नाही. चिंचवडचा विकास करण्यास प्राधान्य देणार असून, शंभर टक्के शास्तीकर माफी, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी सुटसुटीत नियमावली, उपनगरातील कचरा समस्या, नदीसुधार, आयटीयन्सला चोवीस तास पाणी, हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल, हिंजवडी ते चाकण मेट्रोसाठी पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन राहुल कलाटे यांनी दिले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण