शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

Maharashtra Election 2019: मावळात १९९५ चा फॉर्म्युला की राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हॅट्ट्रिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:22 IST

मावळ विधानसभा निवडणूक 2019: गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या.

हणमंत पाटील  

पिंपरी : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मावळात १९९५ ला भाजपाने बंडखोरी करणारांना तिकीट देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी होत आहेत. भाजपाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एक पाऊल मागे घेत ‘१९९५ च्या फॉर्म्युल्या’नुसार त्याच पक्षातून बंडखोरी केलेले उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जुना फॉर्म्युला यशस्वी करायचा की राज्यमंत्री बाळा भेगडे यांना हॅट्ट्रिक करू द्यायची याचा निर्णय मावळवासीयांच्या हाती आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून मावळ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपाच्या उमेदवारीवर १९९५ ला रुपलेखा ढोरे निवडून आल्या होत्या. त्यानंतर सलग दोन वेळा दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे निवडून आले आहेत. तीन महिन्यांपूर्वी बाळा भेगडे यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी त्यांनी मावळात आणला. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी तिसºयांदा उमेदवारीवर दावा केला.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भाजपाचे कार्यकर्ते व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, तसेच पक्ष संघटनेतील युवा कार्यकर्ते रवींद्र भेगडे यांनीही मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा केला होता. भाजपाकडून तिन्ही इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने बंडखोरीच्या भीतीने पहिल्या यादीत मावळची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने पुन्हा एकदा बाळा भेगडे यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षातील बंडखोरीचे आव्हान बाळा भेगडेंपुढे आहे. या निवडणुकीतील समीकरणामुळे सर्वांना १९९५ च्या निवडणूक फॉर्म्युल्याची आठवण ताजी झाली आहे.भाजपातील बंडखोरीने राष्ट्रवादीला ताकदगेल्या काही वर्षांच्या इतिहासात मावळ भाजपात बंडखोरी झालेली नाही. परंतु, राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली. त्यामुळे सुनील शेळके यांनी भाजपा नगरसेवक पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत ऐनवेळी प्रवेश करीत उमेदवारी स्वीकारली. तसेच, रवींद्र भेगडे यांनीही बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपातील बंडखोरीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एक पाऊल मागे घेत आयात सुनील शेळके यांचा स्वीकार केला. शिवाय राष्ट्रवादीतून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या बाळासाहेब नेवाळे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपातील गटबाजीचा व बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी होण्याची शक्यता आहे.

मावळ विधानसभा निवडणुकीवर एक दृष्टिक्षेप१९५२ सरदार वीरधवल  दाभाडे अपक्ष१९५७ रामभाऊ म्हाळगी जनसंघ (भाजपा)१९६२ नामदेव मोहळ काँग्रेस१९६७ रघुनाथ सातकर काँग्रेस१९७२ कृष्णराव भेगडे जनसंघ (भाजपा)१९७८ कृष्णराव भेगडे काँग्रेस१९८० अ‍ॅड. बी. एस. गाडे पाटील काँग्रेस१९८५ अ‍ॅड. मदन बाफना काँग्रेस१९९०   अ‍ॅड. मदन बाफना काँग्रेस१९९५ रुपलेखा ढोरे भाजपा१९९९ दिगंबर भेगडे भाजपा२००४ दिगंबर भेगडे भाजपा२००९ बाळा भेगडे भाजपा२०१४ बाळा भेगडे भाजपाकाय आहे १९९५ चा फार्म्युला?मावळ हा १९६७ मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. त्यापूर्वी १९५७ ला जनसंघाचे (पूर्वीचा भाजपा) रामभाऊ म्हाळगी आणि १९७२ ला कृष्णराव भेगडे निवडून आले होते. १९५७ व १९७२चा अपवाद वगळता १९६२, १९६७, १९७८, १९८०, १९८५, १९९० या सहा निवडणुकांत काँग्रेस पक्षानेच मावळ मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे पूर्वी मावळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, १९९५ हे वर्ष निर्णायक ठरले. या वर्षी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या रुपलेखा ढोरे यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग २५ वर्षांपासून भाजपाचे उमेदवार या मतदारसंघात विजयी होत आहेत. आताच्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा ‘१९९५ च्या फॉर्म्युल्या’प्रमाणे काँग्रेसच्या ऐवजी भाजपात बंडखोरी झाली आहे. भाजपातून बंडखोरी केलेल्या सुनील शेळके यांना राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची उमेदवारी ऐनवेळी देण्यात आली आहे. त्यामुळे मावळवासीयांच्या १९९५ च्या निवडणूक फॉर्म्युल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

टॅग्स :maval-acमावलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस