शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

माण-हिंजवडी मेट्रोचे कोच दाखल; लवकरच होणार ‘ट्रायल रन’ प्रकल्पास वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:07 IST

हिंजवडी ते शिवाजीनगर हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडणारा मेट्रो प्रकल्पातील तिसरा मेट्रो मार्ग

पिंपरी :  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यासह मेट्रोचे कोच देखील दाखल झाले आहे. त्यामुळे लवकरच ‘ट्रायल रन’ घेऊन ऑक्टोबर २०२५ पर्यंत मेट्रो सुरू होईल, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.   

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएकडे आहे. ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या कामातील दिरंगाईमुळे 'पीएमआरडीए'ने ठेकेदाराला दंडात्मक कारवाईचा इशारा देत काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर जुलैपासून काम वेगाने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. हिंजवडी (माण, मेगापोलीस) ते शिवाजीनगर हा पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांना जोडणारा हा मेट्रो प्रकल्पातील तिसरा मेट्रो मार्ग आहे.हा संपूर्ण मार्ग उन्नत असून, पुणे-बंगळुरू महामार्ग आणि मुळा नदीवरून जात आहे. प्रामुख्याने बाणेर, सकाळनगर आणि सिव्हिल कोर्ट स्थानकांची कामे शिल्लक आहेत. यांसह विविध ठिकाणी जिने आणि अकरा स्थानकांचे महत्त्वाचे काम बाकी आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रोची ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे. 

..असा आहे प्रकल्प

प्रस्तावित खर्च : ८,३१३ कोटी रुपयेमेट्रो मार्गाचे अंतर : २३.३ किलोमीटर एकूण स्थानकांची संख्या : २३कामे पूर्ण झालेली स्थानके : १२

मार्चअखेर पुन्हा येणार कोच

आतापर्यंत पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पात गेल्या वर्षी एक तर गेल्या आठवड्यात एक अशा आतापर्यंत दोन ट्रेन अर्थात दोन संच दाखल झाले आहेत. मेट्रोचा तिसरा आणि चौथा संच देखील मार्च अखेर उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. मेट्रोच्या एका संचामध्ये तीन कोच आहेत.  आयटी पार्कमधील ‘कोंडी’ फुटणार

माण-हिंजवडी आयटी पार्कमध्ये लाखो अभियंते नोकरीनिमित्त दररोज ये-जा करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत हिंजवडी परिसरातील रस्त्यांवर मोठी कोंडी होते. मात्र, मेट्रो सुरू झाल्यानंतर या अभियंत्यांना आरामदायक प्रवास अनुभवता येणार आहे. यातून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  

मेट्रो प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण होताच मार्ग सुरक्षा तपासणी केली जाईल. गेल्या वर्षी मेट्रोच्या तीन कोचचा एक संच मिळाला होता. तसेच गेल्या आठवड्यात पुन्हा तीन कोचचा एक संच दाखल झाला आहे. या कोचचे इन्स्पेक्शन सुरू आहे. मेट्रोचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार आहे. - रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासी