शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis: पिंपरी शहरांना रॉकेलचा कोटाच नाही; ग्रामीण भागाला प्राधान्य हजारो अंत्योदय लाभार्थी राहणार वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:01 IST

LPG Gas Crisis: या निर्णयाचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील अंत्योदय लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याने पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांतील नागरिक मात्र वंचित राहणार

पिंपरी : ग्रामीण भागातील गरजू नागरिकांची हेळसांड टाळण्यासाठी राज्य शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब तीन लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ग्रामीण लाभार्थ्यांसाठी दोन लाख लिटर रॉकेलचा कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्ष गरज २४ लाख लिटरची आहे. त्यामुळे तुटवडा कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या निर्णयाचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील अंत्योदय लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याने पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांतील नागरिक मात्र वंचित राहणार आहेत. शहरासाठी रॉकेलचा कोटाच मंजूर नसल्याने हजारो गरजू कुटुंबांची अडचण वाढली आहे. शहरात एकूण १४,१८३ अंत्योदय योजनेतील लाभार्थी आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक देशांप्रमाणे भारतातही इंधन व एलपीजीचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशन दुकाने आणि काही पेट्रोलपंपांवर रॉकेल विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर केला आहे. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हानिहाय वाटप असले तरी शहरांना त्यातून वगळण्यात आले आहे.

गॅस मिळत नसल्याने काही नागरिकांनी गावाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तर काहींनी स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणांचा वापर सुरू केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी भागात कामगार मजुरांची संख्या अधिक आहे. सुमारे ५ लाखांहून अधिक कामगार मजूर हे मेसच्या जेवणावर अवलंबून आहेत. तसेच अनेक कुटुंबांकडे एलपीजी जोडणी नाही. अशा गरीब कुटुंबांसाठी रॉकेल हा एकमेव स्वस्त पर्याय असल्याने रेशन दुकानदारांनीही शहरात रॉकेल पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

शहरातील परिमंडळनिहाय लाभार्थी संख्या :

पिंपरी : ३४,१४९ (१,४३,६२३) | अंत्योदय : १,५९७ (५,७४१)

चिंचवड : ४५,२५१ (१,६५,२७७) | अंत्योदय : २०२ (८२५)

भोसरी : ४५,१८६ (१,६९,९८९) | अंत्योदय : १,९३१ (७,६१७)

एकूण : १,२४,५८६ (४,७८,८८९) | अंत्योदय : ३,७३० (१४,१८३)

शहरांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत. गॅसचा तुटवडा नाही. ग्रामीण भागात गॅससाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे सध्या ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन रॉकेल वाटपाचा निर्णय घेतला आहे.  - दिनेश तावरे, पुरवठा अधिकारी, पुणे विभाग 

सध्या गॅसचा तुटवडा असल्याने नागरिकांकडून रॉकेलची मागणी वाढली आहे. शासनाने कोटा दिल्यासच शहरातील लाभार्थ्यांना रॉकेल मिळू शकेल, अन्यथा ते वंचित राहतील.  - विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटना

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Faces Kerosene Shortage; Rural Areas Prioritized, End-Users Deprived

Web Summary : Pimpri-Chinchwad residents face kerosene scarcity as government prioritizes rural areas due to LPG gas shortages. Despite thousands of eligible beneficiaries, the city lacks kerosene quota, leaving many vulnerable families without affordable cooking fuel options.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई