शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेल्या पाटल्या अन् गवसलेली माणुसकी....!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 17:17 IST

महिन्याला मिळणाऱ्या पाच हजारांच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातूनही त्यांनी हौसेपोटी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या होत्या. मात्र....

ठळक मुद्देपोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून नवीन पाटल्या आजीला घेवून दिल्या.

मंगेश पांडे पिंपरी : ऐंशी वर्षांच्या आजीबार्इंच्या हरविलेल्या पाटल्या सापडल्या नाहीत. मात्र, त्या पाटल्या मिळविण्यासाठी आजीबाईंची सुरु असलेली धडपड पाहून पोलिसांनीच वर्गणी काढत आजीला पाटल्या घेवून दिल्या. याचे ऋण व्यक्त फेडण्यासाठी आजीबार्इंनी पोलीस ठाण्यात येवून पोलिसांचा नारळ व पेढे देवू सत्कार केला. यातून पोलिसांच्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडले.शांताबाई चिंचणे (वय ८०) या पिंपळे गुरव येथे एकट्याच राहतात. महिन्याला मिळणाऱ्या पाच हजारांच्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. यातूनही त्यांनी हौसेपोटी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या करून घेतल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यात आजी उपचारासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी पाटल्या रविल्या. पै-पै जमवून तयार केलेल्या पाटल्या गेल्याने आजीबाई अतिशय निराश झाल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी सांगवी पोलिसात तक्रार देखील दिली,परंतु,  काही महिने उलटूनही पाटल्या काही त्यांना परत मिळाल्या नाहीत. अखेर आजबाईंनी त्यावेळी सांगवी ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक निरीक्षक बलभीम ननावरे यांना सर्व हकिगत सांगितली. आजींच्या तक्रारीची दखल घेत ननावरे यांनी तपासाला सुरूवात केली. त्यांच्या पाटल्या काही सापडल्या नाहीत. दरम्यान, पाटल्या परत मिळतील या आशेनं आजी दर आठवड्याला सांगवी पोलीस ठाण्यात यायच्या. मात्र, प्रत्येक वेळी त्या रिकाम्या हातानेच घरी परतायच्या. पाटल्या मिळविण्यासाठी सुरु असलेली आजींची तळमळ पोलिसांना न पहावल्याने अखेर ननावरे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून नवीन पाटल्या आजीला घेवून दिल्या. यातून पोलिसांतील माणुसकीचे दर्शन घडले. यानंतर हे ऋण फेडण्यासाठी आजींनी श्रीफळ आणि पेढे देवून पोलीस अधिकारी व कर्मचारयांचा सत्कार केला. या सर्व प्रवासात पोलीस आणि आजी आपुलकीचे नाते निर्माण झाले असून आजी देखील नेहमी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत असतात.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाGoldसोनं