शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ चा अंदाज ठरला खरा..! पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत लागली ' यांची' वर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:00 IST

पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या स्थायी समितीत भाजप १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये भाजपच्या राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, अपक्ष झामाबाई बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची आज निवड करण्यात आली. महापौर राहुल जाधव यांनी स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा केली. लोकमत ने स्थायील समितीत कोणाची वर्णी लागू शकते याचा अंदाज वर्तविला होता. तो अचूक ठरला. पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. यातील  गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड,  अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वषार्चा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपणार आहे. त्यांच्या जागी या नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

लोकमतचे वृत खरेरिक्त झालेल्या जागांवर भाजपच्या राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, अपक्ष  झामाबाई बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली.  एकनाथ पवार यांनी भाजपच्या, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीच्या, गटनेते राहुल कलाटे यांनी शिवसेनेच्या  तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिले. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर जाधव यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस