शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोलीत डांबून ठेवत आठ लाखांची मागितली खंडणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 14:38 IST

आरोपी कामाच्या बहाण्याने फिर्यादीला सातारा, कराड, इस्लामपूर येथे घेवून गेला. तेथून पुन्हा येत असताना रस्त्यात एका ठिकाणी त्यांना खोलीत डांबून ठेवले.

पिंपरी : कामाच्या बहाण्याने एकाला मोटारीत बसवून नेले. मात्र, रस्त्यातच एका खोलीत डांबून ठेवत त्याच्या नातेवाईकाकडे आठ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद माली (रा. राजस्थान, पूर्ण पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भवरलाल हिरालाल चौधरी (वय ४७. रा. गल्ली नं. ४, खराडीरोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास त्रिवेणीनगर येथून आरोपी गोविंद हा फिर्यादी चौधरी यांना कामाच्या बहाण्याने सातारा, कराड, इस्लामपूर येथे घेवून गेला. तेथून पुन्हा येत असताना रस्त्यात एका ठिकाणी त्यांना खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर आरोपीने चौधरी यांचा मावस भाऊ दिनेश हेमाराम सिरवी व मामा श्रवणकुमार चौधरी यांच्या मोबाईलवर वेळोवेळी फोन केला. त्यांच्याकडे ८ लाख रुपयांची खंडणी मागत सुरेशला पकडून ठेवले आहे २ लाख रुपये दे तरच सोडतो, सुरेशला माझ्याकडे बसवून ठेवले आहे, पैसे न दिल्यास त्याचे हातपाय तोडून त्याला मारुन टाकेन, मी कोणालाच घाबरत नाही, अशी धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ChikhliचिखलीKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस