शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सराईत गुन्हेगार जोयल पलाणी स्थानबद्ध; पोलीस आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 1:32 PM

येरवडा कारागृहात रवानगी

ठळक मुद्देमामुर्डी, साईनगर, देहुरोड भागात विविध गुन्हे करीत माजविली होती दहशत माजविली

पिंपरी : गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीय आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झिरो टॉलरन्स प्रोग्राम राबविण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत देहूरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जोयल भास्कर पलाणी (वय २१, रा. साईनगर, मामुर्डी) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.       पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. १९) स्थानबद्धतेचे आदेश दिले असून, त्यानुसार आरोपी पलाणी याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलाणी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. मामुर्डी, साईनगर, देहुरोड भागात विविध गुन्हे करीत त्याने दहशत माजविली होती. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. तडीपार असतानाही आरोपी पलाणी देहूरोड हद्दीत येऊन तडीपार आदेशाचा भंग करीत होता. तडीपार असताना त्याने दोन गुन्हे केले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून देहूरोड पोलिसांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार आरोपी पलाणी याला स्थानबद्ध करण्यात आले.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, पीसीबी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, अनिल जगताप यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस