दोन लहान मुलांसह आत्महत्या करणाऱ्या महिलेला स्थानिकांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:00 IST2020-05-18T20:59:26+5:302020-05-18T21:00:11+5:30

७ वर्षांच्या मुलाला वाचविण्यास स्थानिक तरुणांना यश आले नाही.

Local citizen rescued a women who try committed suicide with two small children | दोन लहान मुलांसह आत्महत्या करणाऱ्या महिलेला स्थानिकांनी वाचविले

दोन लहान मुलांसह आत्महत्या करणाऱ्या महिलेला स्थानिकांनी वाचविले

निगडी : एका महिलेने दोन लहान मुलांसह चिखलीलगत असलेल्या सोनवणेवस्ती येथील विहिरीत सोमवारी (दि. १८) उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक रहिवाशांमुळे महिला आणि एक मुलगा वाचला आहे, तर एकाचा मात्र मृत्यू झाला आहे. रूपाली गणेश गाढवे वय (वय ४० रा. शिवकृपा हौसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर) गंधर्व गणेश गाढवे (वय ५) असे बचावलेल्यांची नावे आहेत. तर गौरव गणेश गाढवे (वय ७) असे मृताचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, स्थानिक रहिवाशी संतोष सोनवणे व नितीन सोनवणे यांना विहिरीत कोणीतरी उडी मारल्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ विहिरीत उडी मारून एका मुलाला बाहेर काढले. तर महिलेलाही क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या दोघांचे प्राण वाचले. मात्र, ७ वर्षांच्या मुलाला वाचविण्यास स्थानिक तरुणांना यश आले नाही. चिखली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Local citizen rescued a women who try committed suicide with two small children