शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भोसरी येथून गायब झालेली चिमुकली सात तासाने सुखरूप परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 15:16 IST

चिमुकली आलिया कोठे गेली हे कळेना, वडील तसेच आईचा जीव कासावीस झाला. सर्वत्र तिचा शोध घेतला.परंतु,..... 

ठळक मुद्दे भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक यांच्या पथकाची घेतली केली मदत ३५ ते ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलियाची शोध मोहीम सुरू

पिंपरी : भोसरी, भगतवस्ती परिसरातून गायब झालेली साडेचार वर्षांची आलिया ही चिमुकली तब्बल सात तासाने सुखरूप घरी पोहचली. आलिया खेळता खेळता घरापासून दीड किलोमीटर अंतर पुढे गेली. घर सापडेना, अखेर ती एका ठिकाणी झोपी गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. रात्री दहा वाजता तिला घरी सुखरूप सोडले.

   चिमुकली आलिया कोठे गेली हे कळेना, वडील मोहम्मद हैदर खान तसेच आईचा जीव कासावीस झाला. सर्वत्र तिचा शोध घेतला. परंतु तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता. एकुलती एक मुलगी बेपत्ता झाल्याने आई,वडील चिंताग्रस्त झाले. खान यांनी भोसरी पोलीस ठाणे गाठले. भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा एक यांच्या पथकाची मदत घेतली. पोलिसांनी काही तासातच चिमुकलीला शोधून काढण्यात आले.आलिया मोहम्मद खान वय साडेचार वर्ष ही चिमुकली शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास गेलेली आलिया रात्र झाली तरी परत आली नाही. त्यामुळे खान कुटुंबिय व्याकुळ झाले. रात्री आठ वाजता भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन साडेचार वर्षीय आलिया अचानक खेळता खेळता घराबाहेर गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. भोसरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आणि ३५ ते ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलियाची शोध मोहीम सुरू केली. शोध घेण्यासाठी रस्त्यावरील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज भोसरी पोलिसांनी तपासले. एका सीसीटीव्हीमध्ये आलिया चालत जात असल्याचे दिसले. यावरूनच पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास त्या दिशेने जात दीड किलोमीटर अंतर कापलं. आलिया एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या कडेला झोपली असल्याचे निदर्शनास आले.तिची शोध मोहीम संपली. अलियाचा शोध घेण्यात भोसरी पोलिसांना यश मिळाले. तब्बल सात तासानंतर आलिया पुन्हा घरी आल्याचे पाहून आई वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांचा चेहरा आनंदाने फुलला, त्याचबरोबर डोळ्यातून  आनंदाश्रू तरळले. दोघांनी पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :bhosariभोसरीPoliceपोलिसChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा