शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

खासगी फ्लेक्सलाही परवान्याची अट, सर्वसाधारण सभेची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:26 IST

जाहिरातीद्वारे शहरात विद्रूपीकरण होत असून, महापालिकेच्या वतीने प्रतिबंध करण्याबरोबरच जाहिरात धोरण करण्यासंदर्भात लोेकमतने पाठपुरावा केला होता.

पिंपरी - जाहिरातीद्वारे शहरात विद्रूपीकरण होत असून, महापालिकेच्या वतीने प्रतिबंध करण्याबरोबरच जाहिरात धोरण करण्यासंदर्भात लोेकमतने पाठपुरावा केला होता. त्यानुसार धोरण तयार केले आहे. खासगी जागांबरोबरच आता खासगी जागेतील फ्लेक्सला महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. महापालिकेच्या वतीने स्वतंत्र ‘बाह्य जाहिरात धोरण २०१८’चा मसुदा तयार केला असून, त्याला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.मुंबई प्रांतिक महापालिका आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत महापालिका आकाशचिन्ह विभागामार्फत खासगी आणि शासकीय जागांवरील जाहिरातींना परवानगी दिली जाते. यासाठी महापालिकेची स्वतंत्र अशी जाहिरात नियमावली नाही. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने महापालिकेचे स्वतंत्र असे बाह्य जाहिरात धोरण होणे गरजेचे होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानुसार महापालिकतर्फे बाह्य जाहिरात धोरण २०१८ चा मसुदा विधी समिती सभेसमोर ठेवला होता.महापालिकेचे धोरण जाहिरातफलकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील अभ्यासावरून तयार केले आहे. रस्तासुरक्षा विषयासही महत्त्व दिले आहे. तसेच महसुलाबरोबर जाहिरातीद्वारे होणाऱ्या विद्रूपीकरणास प्रतिबंध होणार आहे. बाह्य जाहिरात माध्यमांना जागा निश्चित केल्यानंतर मोठ्या जाहिरात माध्यमांना मोठी व्यावसायिक केंद्रे आणि मोठे रस्ते अशा प्रकारे शहरातील निवडक भाग व ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. रेल्वेचे डबे, बस, मेट्रो, व्यापारी वाहने अशा चलत प्रवासी साधनांसह स्ट्रीट फर्निचर म्हणून संबोधल्या जाणाºया बसथांबे, मेट्रो थांबे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचराकुंड्या, उद्याने अशा ठिकाणी जाहिरात करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा या धोरणात अंतर्भाव केला आहे.कालावधी १ ते १२ महिने४खासगी मालमत्तेवर जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी जाहिरात माध्यमाचा परवाना कालावधी एक वर्षाचा राहणार आहे. या परवान्याचे नूतनीकरण प्रत्येक वर्षी करण्यात येईल. सार्वजनिक मालमत्तेवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पारदर्शक व खुल्या पद्धतीने राबविलेल्या निविदाप्रक्रियेमध्ये नमूद केलेल्या कालावधीनुसार परवाना देण्यात येणार आहे. हा कालावधी जागेच्या व्यवहार्य व योग्यतेस अनुसरून राहणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील जाहिरातीचा परवाना कालावधी एक महिना राहणार आहे.असा मिळेल परवानाशहरातील इमारती किंवा जमिनीवर जाहिरातफलक प्रदर्शित करायचा आहे, त्या जागा किंवा इमारत मालकाकडील ‘ना हरकत दाखला’, इमारत पूर्णत्वाचा दाखला, तसेच इमारतीचे बांधकाम सुरू असल्यास बांधकाम परवानगी दाखला जोडावा. तसेच गृहरचना संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला व संस्थेच्या लेखापरीक्षकाने पडताळणी करून दिलेला ‘ना हरकत ठराव’ जोडणे आवश्यक राहणार आहे. जाहिरातफलकामुळे कोणाला त्रास झाल्यास अथवा कोणी दावा लावल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही. तसेच त्याचा संपूर्ण खर्च संबंधित जागामालक आणि जाहिरातदार यांचा राहील, अशा आशयाचे हमीपत्र देणे बंधनकारक राहणार आहे. ज्या ठिकाणी जाहिरात लावायची आहे, त्या ठिकाणी ६० मीटर अंतरावरून घेण्यात आलेल्या छायाचित्राच्या तीन प्रती जाहिरातफलकाच्या र्माकिंगसह सादर कराव्या लागणार आहेत.कोणत्याही जागेत, इमारती, भिंती, विजेचे खांब, वाहने आदी ठिकाणी कोणाही व्यक्तीला कोणतीही जाहिरात प्रदर्शित करणे, त्यासाठी सांगाडा उभारण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय जाहिरात लावता येणार नाही. अवैध आणि बेकायदा बाह्य जाहिरातींवर महापालिकेचे नियंत्रण राहील. अशा जाहिराती काढून टाकण्याचा अधिकार महापालिकेला असणार आहे. असे उल्लंघन करणाºया व्यक्तींवर महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड