बिबट्याचे दुचाकीस्वारांवर हल्ले सुरूच
By Admin | Updated: October 13, 2016 01:57 IST2016-10-13T01:57:30+5:302016-10-13T01:57:30+5:30
तालुक्यात बिबट्यांचे दुचाकीस्वारांवर हल्ले सुरूच आहेत. पिंपळगाव सिद्धनाथ येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका दुचाकीस्वारावर हल्ला केला.

बिबट्याचे दुचाकीस्वारांवर हल्ले सुरूच
जुन्नर : तालुक्यात बिबट्यांचे दुचाकीस्वारांवर हल्ले सुरूच आहेत. पिंपळगाव सिद्धनाथ येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका दुचाकीस्वारावर हल्ला केला. यात ते वाचले.
मच्छिंद्र पानसरे असे त्यांचे नाव असून, ते माजी उपसरपंच आहेत. सोमवारी (दि. १०) रोजी रात्री आठच्या सुमारास पानसरे हे पिंपळगाव सिद्धनाथमार्गे पानसरेवाडीकडे जात होते. ओढ्याजवळच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटारसायकलवर झेप घेतली. या वेळी बिबट्याने त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पानसरे यांनी मोटारसायकलचा वेग वाढविल्याने बिबट्या पळून गेला. पानसरे थोडक्यात बचावले. संतोष खंडागळे, सत्यवान खंडागळे, सोपान पानसरे, संदेश खंडागळे, दिनकर नायकोडी, सुभाष खंडागळे यांनी पानसरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)