शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार ; गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 10:49 IST

कामशेत जवळील टाकवे खुर्द गावामध्ये बिबट्याने घाेडीची शिकार केल्याने गावामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

कामशेत  : कामशेत जवळील टाकवे खुर्द गावामध्ये  बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याची बातमी लोकमतने प्रकाशित केली होती. यावर सर्च चालु असल्याचे वन विभागाने सांगितले असतानाच शुक्रवार (दि. १४)  रोजी गावातील शाळेच्या मागच्या बाजुला असलेल्या धनगराच्या घोडीवर रात्री हल्ला करून बिबट्याने तिची शिकार केली.

      सह्याद्रीच्या कुशीत वसलेले टाकवे गावाच्या उत्तरेकडे मोठा डोंगर असून या परिसरात घनदाट जंगल आहे . या भागात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जंगलामध्ये पाण्याची वानवा आहे. या भागातून पाण्याच्या शोधात बिबटे गावात आल्याचा अंदाज स्थानिक गावकरी व्यक्त करत आहे. शेतकरी उशिरापर्यंत शेतात काम करत असतात. त्यातच बिबटा आढळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच एका घोडीवर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे  गावातील पाळीव जनावरे किती सुरक्षित आहेत हाच नेमका प्रश्न असून वन विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदार सर्च ऑपरेशन करून व पिंजरा लावुन बिबट्यांना पकडावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

    गेल्या काही दिवसांपासुन याठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी करून वन विभागाकडून दोन टीमची नियुक्ती केली गेली होती. परंतु पुढे या टीमला काहीच हातात लागले नाही व आज एका घोडीचा हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यु झाला.याबाबत बाेलताना शिराेताचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मारणे म्हणाले, प्राथमिक माहितीत हा हल्ला बिबट्यानेच केला असावा असा अंदाज आहे. घोडीला शवविच्छेदन करण्यास न पाठवता त्या ठिकाणी एक कॅमेरा लावून पुन्हा खाण्यास बिबटया येतो का ते पाहत असुन नागरिकांनी सतर्क राहावे व रात्री फिरणे टाळावे असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूkamshetकामशेतleopardबिबट्या