शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Video: पिंपरीत राष्ट्रवादीचे ‘चले जाव भाजप’ आंदोलन; हजारो कार्यकर्त्यांचा महापालिकेसमोर महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:39 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, भ्रष्टाचारी सत्ताधारी चले जाव, आदी घोषणा देण्यात आल्या

पिंपरी : महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘चले जाव भाजपा’  हे आंदोलन आज करण्यात आले. राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी पिंपरी महापालिकेसमोर राडा केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी ‘‘निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला उलथवून टाकू, अशी टीका यावेळी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीत बदल केले आहेत. त्यानंतर पहिला महामोर्चा काढण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या  भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने चले जाव भाजपा हे आंदोलन केले.

चिंचवड स्टेशन येथून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, भ्रष्टाचारी सत्ताधारी चले जाव, आदी घोषणा देण्यात आल्या.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, ‘‘हा मोर्चा महापालिकेतील भ्रष्टाचारावर हल्लाबोल आहे. महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवण्यात येईल.  सत्ताधारी भाजपाने इंद्रायणी नदीत सुधार प्रकल्पात घोटाळा केला, स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरले, पाणी पुरवठा नियोजनात अपयश आले, कचऱ्याच्या प्रकल्पात घरातील लोकांना स्वत:च्या बगलबच्चना ठेका देऊन पैसे लाटले, चुकीचा वाढीव खर्च दाखवून निवडणुकांचा फंड गोळा केला, विद्यार्थ्यांच्या गुडफिल किट मध्ये देखील पैसे खाल्ले अशा एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत.’’

अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. पाच वर्षांपूर्वी शहरास दिलेली आश्वासने पूर्ण होऊ शकली नाहीत. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याचा पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. चुकीच्या कामांना आता थारा दिला जाणार नाही.’’

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिका