पिंपरी : ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर नाचवणाºया धमाकेदार लावण्या, प्रसिद्ध तारकांची दिलखेचक अदाकारी, अवघ्या सखी मंच सभासदांचे मनमुराद मनोरंजन आणि महिलांनी शिट्या आणि टाळ््यांनी दिलेली दाद ही ‘लोकमत सखीमंच’ च्या लावणी महोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. ती यंदाही पिंपरी-चिंचवडमध्ये सखींना अनुभवयाला मिळणार आहेत.लोकमत सखीमंचच्या २०१८ मधील सखीमंच नोंदणीस सर्वत्र सुरूवात झाली आहे. नवीन सभासद नोंदणी व जुन्या सभासदांच्या नुतनीकरणास दमदार सुरूवात झाली असून, आकर्षक किचन कॉम्बो सेट, इतर बक्षिसे व वर्षभर सखींसाठी विविध कार्यक्रम यामुळे सभासद नोंदणीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीच्या सखी सभासदांसाठी बुधवारी (दि.२१) रोजी सायंकाळी पाच वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘‘लावणी महोत्सव २०१८’’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात लावणी सम्राज्ञी पुनम कुडाळकर, पुजा पाटील (अकलुज लावणी सम्राज्ञी), अर्चना जावळेकर (कॉलेज जर्नी फेम), स्वाती दसवडकर (नाच शालु नाच फेम), संगीता लाखे, प्राची मुंबईकर या लावणी तारकांच्या अदाकारीचा, तुफान नृत्याविष्काराचा आनंद महिलांना लुटता येणार आहे.
लावणी महोत्सव बुधवारी रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 06:24 IST