Pimpri Chinchwad | हसणं पडलं महागात, थेट कोयत्यानेच वार; दोन सख्या भावांना अटक
By रोशन मोरे | Updated: April 1, 2023 19:00 IST2023-04-01T18:55:29+5:302023-04-01T19:00:02+5:30
चेष्टा मस्करीमध्ये हसला म्हणून थेट कोयत्यानेच वार करत जखमी..

Pimpri Chinchwad | हसणं पडलं महागात, थेट कोयत्यानेच वार; दोन सख्या भावांना अटक
पिंपरी : गप्पा मारताना चेष्टा मस्करीमध्ये हसला म्हणून थेट कोयत्यानेच वार करत जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) अजंठानगर, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी संतोष आसाराम सोनवणे (वय २०, रा. अजंठानगर, चिंचवड) यांना निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अंकुश शामराव कुऱ्हाडकर (वय २०), लव शामराव कुऱ्हाडकर (वय १८, दोघे रा. अजंठानगर, चिंचवड) यांना अटक केली आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे गप्पा मारत होते. तेव्हा चेस्टा मस्करीमध्ये फिर्यादी हसले याचा राग आरोपी अंकुश याला आला. त्याने फिर्यादीची थोबाडीत मारली. त्यावेळी फिर्यादीचे भाऊ ज्ञानेश्वर व सनी आले. अंकुश याने त्याचा भाऊ लव याला सोबत आणले. दोघा भावांनी मिळून फिर्यादीचा भाऊ ज्ञानेश्वर व सनी यांच्या हातावर व डोक्यावर कोयत्याने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिविगाळ करत दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.