शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

पिंपरी-चिंचवडमधील दिवसेंदिवस फोफावणारी गुन्हेगारी रोखण्याचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 13:12 IST

अवैधधंदे बंद करून गुन्हेगारांना पोलिसांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र दारू पिऊन, नशा करून किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार वाढतच राहिले.

ठळक मुद्देबिष्णोई यांना सत्ताधाऱ्यांची नाराजी भोवली : कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच झाली बदली

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्यात अपयश आल्याने दोन वर्षांत दोन आयुक्तांच्या बदल्या झाल्या. सत्ताधाऱ्यांची नाराजी ओढावल्याने आयुक्त संदीप बिष्णाई यांचा तर एक वर्षांचा ही कालावधी पूर्ण झाला नाही.त्यामुळे नवीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यापुढे शहरातील गुन्हेगारी व अवैध धंदे रोखण्याचे आव्हान आहे.  

गेल्या वर्षी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. दरम्यान निवडणुकांच्या काळातच आर. के. पद्मनाभन सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांची २० सप्टेंबर २०१९ रोजी पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. २१ सप्टेंबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्याचदिवशी दुपारी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जारी झाली. कम्युनिटी पोलिसिंगवर भर देऊन आयुक्त बिष्णोई यांनी कामकाज सुरू केले. 

शहरातील अवैधधंदे बंद करून गुन्हेगारांना पोलिसांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र दारू पिऊन, नशा करून किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार वाढतच राहिले. त्यामुळे अवैधधंदे बंद करण्याची मागणी होऊ लागली. जानेवारीमध्ये ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर ‘अवैध धंद्यांचे आगार’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त बिष्णोई यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून १२२ आरोपींना अटक केली. सव्वा लाखांची दारु व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर सहा महिने अवैध धंदे बंद ठेवण्यात आले.  पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने छुप्या पद्धतीने सुरू झाले.

अवैध धंद्यांची मंत्रालयात झाली होती तक्रार...‘लोकमत’च्या उद्योगनगरी बनतेय ‘अवैध धंद्याचे आगार’ या वृत्तमालिकेची दखल स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले. तसेच, बनसोडे यांनी शहरातील अवैधधंद्यांचा प्रश्न मंत्रालयापर्यंत पोहचविला. त्यामुळे आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली होईल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र गणेशोत्सव आदी सण उत्सव असल्याने बदली झाली नाही. मात्र गणेशोत्सवानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश देण्यात आले.

कॅटकडे धाव घेणार?आयुक्तपदाचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याने संदीप बिष्णोई हे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. आयुक्त म्हणून बिष्णोई यांनी कोरोना महामारीत समाधानकारक काम केले. कोरोना सेलची स्थापना करून शहर पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी यांना कोरोना चाचणी व उपचारासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार