शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

"राजकीय नेत्यांची दादागिरी, अधिकाऱ्यांचा आणि पतपेढीचा भ्रष्टाचार बाहेर काढणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 11:48 IST

किरीट सोमय्या यांनी सोमवारी तळेगाव दाभाडे येथे माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली...

तळेगाव दाभाडे (पुणे) : पतपेढींचा भ्रष्टाचार, दादागिरी व छोट्या शेतकऱ्यांवर होत असलेला अत्याचार जे कोणी राजकीय नेते, सरकारी अधिकारी करतात अशांचा भ्रष्टाचार आजपासून बाहेर काढणार असल्याचे माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. किरीट सोमय्या यांनी सोमवारी तळेगाव दाभाडे येथे माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आंबेगाव तालुका भाजपचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, शहराध्यक्ष रवींद्र माने, स्वप्नील भेगडे, संदीप नाटक, अंशू पाठक, किरण ओसवाल, विलास ओसवाल, माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल उपस्थित होते.

समुद्रकिनाऱ्याची जमीन जे मंत्री अनिल परब यांनी खाल्ली होती. ती पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा अनिल परब यांच्या कॉन्ट्रॅक्टरने कलेक्टरच्या हातात दिली. इथला हिशोब इथेच द्यावा लागतो. रिसॉर्ट तुटला अनिल परब व सदानंद कदमवर एफआयआर झाला. अनिल परबवर तीन केसेस सुरू आहेत. त्यामुळे कोणाच्याही मार्फत काही पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी अथर रोड जेलमध्ये एक कोठडी मोकळी झाली आहे. हे सदानंद कदम, अनिल परब व जे कोणी सरकारी अधिकारी त्यांना मदत करत आहेत त्यांनी लक्षात ठेवा, असेही सोमय्या म्हणाले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांना विचारणा केली असता सोमय्या म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. संपूर्ण देशातील नागरिक त्यांना मानतात. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. कोणाची काही बोलताना चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे व माफी देखील मागायला हवी.

टॅग्स :PuneपुणेKirit Somaiyaकिरीट सोमय्याMaharashtraमहाराष्ट्र