डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 15, 2024 09:16 AM2024-04-15T09:16:20+5:302024-04-15T09:17:42+5:30

आई असताना बाबासाहेब तळेगावच्या बंगल्यावर अनेकदा आले होते, मुलाने दिला आठवणींना उजाळा

Kashibai Gaikwad passed away who fed food to Dr.Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जेवण खाऊ घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचं निधन

पिंपरी :  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक वेळेला आनंदाने जेवण बनवून खाऊ घालणाऱ्या काशीबाई दत्तात्रय गायकवाड (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (दि.१४) निधन झाले. 

आपल्या हयातीत बाबासाहेब तळेगावच्या बंगल्यावर ४८ वेळा आले होते. आईच्या जाण्याने आता त्या सर्व आठवणी स्मरणात आहेत, असे काशीबाई यांचा मुलगा बृहस्पती यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काशीबाई यांचा जन्म ७ एप्रिल १९२९ रोजी झाला. नुकताच त्यांचा ९५ वा वाढदिवस साजरा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी (१४एप्रिल) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
 

Web Title: Kashibai Gaikwad passed away who fed food to Dr.Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.