कासारवाडी होणार मल्टिमोड ट्रान्सपोर्ट हब. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 04:19 AM2017-12-31T04:19:36+5:302017-12-31T04:19:54+5:30

स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल करणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच होत आहे. यास कारणीभूत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर अधिक प्रमाणावर वाढला आहे. वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून मल्टिमोड ट्रॉन्सपोर्टची निर्मिती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर यासाठी भर देण्याची मानसिकता निर्माण करणे होय.

 Kasarwadi will become a multimedia transport hub. Steps for Public Transportation Empowerment | कासारवाडी होणार मल्टिमोड ट्रान्सपोर्ट हब. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणाचे पाऊल

कासारवाडी होणार मल्टिमोड ट्रान्सपोर्ट हब. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणाचे पाऊल

googlenewsNext

- विश्वास मोरे 
पिंपरी : स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल करणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच होत आहे. यास कारणीभूत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर अधिक प्रमाणावर वाढला आहे. वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून मल्टिमोड ट्रॉन्सपोर्टची निर्मिती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर यासाठी भर देण्याची मानसिकता निर्माण करणे होय. स्मार्ट सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी नवे पाऊल टाकण्यात येत आहे. कासारवाडी हे शहरातील पहिले मल्टिमोड ट्रान्सपोर्ट हब होणार आहे.
शहराची लोकसंख्या बावीस लाखांवर पोहोचली आहे. गाव ते महानगर, स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल सुरू आहे. महापालिकेची निर्मिती झाल्यापासून नागरीकरण वाढल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर वाहने येत असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत आहे. वाहतूककोंडी वाढण्याबरोबच शहराचे प्रदूषणही वाढत आहे. सन २०१६-१७ या वर्षांत डिझेलची ६,३५९ वाहने, पेट्रोलची १,२१,२४७ वाहने, सीएनजी आणि एलपीजीची ९,७७७ वाहने खरेदी करण्यात आली. शहरात आजवर १ लाख २२ हजार २०८ डिझेलची वाहने, तर पेट्रोलची वाहने १३,७७,६२२ आहेत. सीएनजी आणि एलपीजीवर चालणारी वाहने ७६,१८९ एवढी आहे. डिझेल वाहन वापरण्याचे प्रमाण पावणे आठ टक्के तर पेट्रोल वाहन चालविण्याचे प्रमाण ८७.४१ टक्के तर सीएनजी आणि एलपीजी वाहन वापरण्याचे प्रमाण ४.८३ टक्के आहे. पेट्रोलची वाहने वाढत आहेत. सीएनजी आणि गॅसवर वाहने चालविण्याचे प्रमाण कमी आहे, असे प्रादेशिक परिवहन विभागाची आकडेवारी सांगते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूकसेवा सक्षम होणे गरजेचे आहे.
अशी आहे, वाहतूक सेवा
महापालिका परिसरातील अंतर्गत भागात सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नाही. पीएमपीच्या वतीने वेळेचेही पालन करीत नाहीत. त्यामुळे नागरिक खासगी वाहनांचा वापर करतात. तसेच रेल्वे लोकलच्या फेºयांची संख्या कमी आहे. तासाभराने एक लोकल येते. हेच चक्र अनेक वर्षांपासून सरू आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही ताण येतो.
नो पार्किंग झोनचे नियोजन
नागरिकांना सार्वजनिक वाहतूकसेवा सक्षमपणे मिळाली तर खासगी वाहनांचा वापर टाळता येणार आहे. त्यासाठी शहरात वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नो पार्किंग झोनचे नियोजन करणे गरजेचे आहे. नो पार्किंग झोन पॉलिसी आणण्यात येत आहे. त्यातून वेळेची आणि पैशांचीही बचत होणार आहे.

साथीचे आजार वाढले
१वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषित वायूंच्या उत्सर्जनामुळे तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवा दूषित करणाºया घटकांमध्ये आढळणारा नायट्रोजन डायआॅक्साईड हा वायू प्रामुख्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या इंजिनमधील इंधन ज्वलनामुळे निर्माण होतो. वायुप्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारात वाढ झाली आहे. दमा, खोकला, हृदयरोग, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ अशा आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
वाहनांमुळे सत्तर टक्के प्रदूषण
२सीएनजीचा कमी वापर होत असल्याने वाहनांमधील धुराद्वारे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. शहरात इतर कारणांपेक्षा वाहनांमुळे सुमारे ७० टक्के प्रदूषण होत आहे. त्यामुळे १५ वर्षांपेक्षा जास्त वापर झालेल्या वाहनांचा वापर बंद केला पाहिजे. सीएनजी किंवा इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर करण्यास उत्तेजन देण्याची गरज आहे. सीएनजी किट बसविलेल्या रिक्षा परवानाधारकांना अनुदान दिले जाते. अर्ज केलेल्या १ हजार २७० रिक्षाचालकांपैकी केवळ ६५३ रिक्षाचालकांना अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित रिक्षाचालकांना अनुदान द्यायला हवे.
पीएमपीच्या बस इलेक्ट्रिक हव्यात
३पीएमपीकडे स्वत:च्या मालकीच्या बसपैकी ८२९ बस डिझेलवर चालणाºया आहेत. तर केवळ ३७३ बस सीएनजीवर धावणाºया आहेत. भाडेतत्त्वावरील ६५३ बस आणि पीपीपी तत्त्वावरील २०० बस सीएनजीवर चालणाºया आहेत. पीएमपीच्या बससाठी डिझेलचा वापर ४ हजार ५४६ लिटर होतो. १ लाख ३९ हजार किलो सीएनजीचा वापर होतो. पीएमपीमार्फ त सीएनजीवरील बसगाड्यांना प्राधान्य दिले जात असले तरी स्वत:च्या मालकीच्या बस मोठ्या संख्येने डिझेलवरच धावत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्यासाठी गरज आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी अ‍ॅप
पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे, मेट्रो, बीआरटी आणि अंतर्गत भागातील बससेवा यांच्यात सूसूत्रता आणून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. घरापासून तर एखाद्या व्यक्तीला पुण्यात कामास जायचे असेल तर त्याला इच्छित ठिकाणी सहजतेने पोहोचता यावे, यासाठी मल्टिमोड ट्रान्सपोर्ट ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अ‍ॅपही विकसित केले जाणार आहे.
या अ‍ॅपमध्ये आपण आपले सध्या वास्तव्याचे असणारे स्थळ आणि कोणत्या इच्छित स्थळी जाणार आहे, ही माहिती टाकल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणते पर्याय आहेत, याची माहिती मिळणार आहे. बसगाड्यांची कनेक्टीव्हीटी वाढविण्यात येणार आहे. वेळांचे नियोजनही केले जाणार आहे. पॉर्इंट टू पॉईंट वाहतूक सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेत ज्या सुधारणा करायच्या आहेत. त्यापैकी स्मार्ट सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. लोक अर्बन मोबीलीटी ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. स्मार्ट सार्वजनिक वाहतूकसेवेतील अडचणी काय? यावर अभ्यास केला जात आहे. रेल्वे, मेट्रो, बीआरटी या सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये समन्मय साधून मल्टिमोड ट्रान्सपोर्ट कसे राबविता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांना घरापासून घरापर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा मिळाली तर ते खासगी वाहनांचा वापर टाळतील. त्यातून प्रदूषण कमी होईल, वाहतूकीकोंडी कमी होईल, तसेच वाहतूक सेवेवर होणारा खर्चही कमी हाईल. तसेच वाहनांवर होणार खर्चही कमी होणार आहे. त्यासाठी पार्किंग पॉलिसी आणण्यात येणार आहे. वाहतूकसेवेसाठी अ‍ॅपही विकसित करण्यात येणार आहे. कासारवाडी पहिले मल्टिमोड ट्रान्सपोर्ट हब करायचे आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त,
पिंपरी-चिंचवड महापालिका


 

Web Title:  Kasarwadi will become a multimedia transport hub. Steps for Public Transportation Empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.