कार्ल्यातील एकविरा देवीच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 11:08 IST2017-10-03T09:42:11+5:302017-10-03T11:08:52+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाली आहे. सोमवारी रात्री ही चोरी झाली आहे.

कार्ल्यातील एकविरा देवीच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला
लोणावळा : कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाली आहे. सोमवारी रात्री ही चोरी झाली आहे. एकविरा देवीच्या मंदिराला तीन वर्षापूर्वी एका भाविकाने सोन्याचा कळस मंदिराला अर्पण केला होता. चोरी झालेल्या कळसाची किंमत साधारण सव्वा लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.
त्यानंतर मंगळवारी ही घटना उघडकीस आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच देवस्थानचे विश्वस्त, गुरव, स्थानिक नागरिक मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.