फक्त ....पाच रुपये दिले नाही म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:54 IST2018-08-13T15:52:38+5:302018-08-13T15:54:02+5:30

पाच रुपये दिले नाहीत, या कारणास्तव एका तरुणावर धारदार शस्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Just because ... not given the five rupees, a half murder attack on youth | फक्त ....पाच रुपये दिले नाही म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला 

फक्त ....पाच रुपये दिले नाही म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला 

पिंपरी : पाच रुपये दिले नाहीत, या कारणास्तव एका तरुणावर धारदार शस्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री हिंजवडी येथे घडली. चैतन्य भगवान डुकरे (वय २२, रा. मुक्ताईनगर, हिंजवडी) असे जखमी  तरुणाचे नाव आहे. दोघांविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी(दि.११आॅगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी व आरोपी यांच्यात पाच रुपयांवरुन भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून चैतन्य याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Web Title: Just because ... not given the five rupees, a half murder attack on youth