अकराव्या माजल्यावरून उडी मारून विवाहितेची वाकडमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:37 IST2018-02-09T18:35:23+5:302018-02-09T18:37:40+5:30
काळेवाडी येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील सफायर इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अकराव्या माजल्यावरून उडी मारून विवाहितेची वाकडमध्ये आत्महत्या
ठळक मुद्देशुक्रवारी (दि. ९) दुपारी चारच्या सुमारास घडली घटनाआत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट
पिंपरी-चिंचवड (वाकड) : काळेवाडी येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील सफायर इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) दुपारी चारच्या सुमारास घडली. पल्लवी उदयन मुजुमदार (वय ३०) असे त्या महिलेचे नाव आहे.
या सोसायटीत प्रत्येक इमारतीला गारबेज टाकण्याचे डक्ट आहे. या डक्टमधून तीने उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजले नाही. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.